विशेषशैक्षणिक

शिरूर येथे करियर संसदेची स्थापना व शपथविधी सोहळा संपन्न


शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम )शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात ‘करिअर संसद’ स्थापन करण्यात आली असून विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.
बोरा महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत ‘करिअर संसद’ची स्थापना करण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी करिअर संसदेत निवड झालेल्या 14 पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते हे होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव, करिअर कट्ट्याचे समन्वयक डॉ. ज्ञानोबा चाटे, सल्लागार डॉ. ए. डी. केत, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. डी. एच. बोबडे, तसेच डॉ. आप्पासाहेब चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या समारंभात प्राचार्य डॉ. के सी.मोहिते यांनी पदाधिकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. महाविद्यालयात करिअर कट्ट्याचे विविध उपक्रम राबविणे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये करिअरच्या विविध संधी , विविध स्पर्धा परीक्षा याबाबत जाणीव जागृती करणे इत्यादी उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या करिअर संसदेत मुख्यमंत्री म्हणून ज्ञानेश्वरी रामचंद्र पाचुंदकर या विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. इतर मंत्र्यांमध्ये नियोजन मंत्री -वंदिता मिश्रा,
कायदे व शिस्त पालन मंत्री- तनिष्क पाटील,
सामान्य प्रशासन मंत्री- सुप्रिया सालके
माहिती व प्रसारण मंत्री-स्नेहल शरद गायकवाड,
उद्योजकता विकास मंत्री- स्नेहा जाधव
रोजगार व स्वयंरोजगार मंत्री- प्राची बढे,
कौशल्य विकास मंत्री- विकास कापूरे,
संसदीय कामकाज मंत्री-मेघा वरखडे,
महिला व बालकल्याण मंत्री- सानिका वाखारे,तर इतर सदस्य म्हणून कादंबरी जगताप, अर्णव बेद्रे, आयुष महाजन या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी सांगितले की, “करिअर कट्टा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये करिअरबाबत जागरुकता वाढवणे, उद्योजकीय कौशल्य विकसित करणे आणि महाविद्यालयीन पातळीवर उपलब्ध असलेल्या नोकरीच्या, स्पर्धा परीक्षांच्या व प्रशिक्षणाच्या संधी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे. याकरिता करिअर संसद ही प्रभावी माध्यम ठरणार आहे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा असे आवाहन केले. यावेळी डॉ. ए. डी.केत यांचेही भाषण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चाटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विविध शाखांमधील 150 विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button