शिवराज्यभिषेक दिनानिमित्त प्रबोधनत्मक कार्यक्रम व तंत्र नाविन्यता प्रदर्शनाचे आयोजन
-

oplus_131074
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
३५१ व्या शिवराज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त तात्या टोपे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरुर येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे व तंत्रनाविन्यता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व दीपप्रज्वलन
मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्रालयातील सेवानिवृत सचिव देवेंद्र पांडूरंग कोळपकर , प्राचार्य संतोष गोसावी , उपप्राचार्य दिनकर जाधव , निवेदक संतोष झंजाड आदी उपस्थित होते . प्रा.बबनराव उकिर्डे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .
यावेळी देवेंद्र पांडुरंग कोळपकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजही उपयुक्त आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांनी आत्मनिर्भयतेला प्राधान्य दिले .भारत देशाची महासत्ता होण्याचा दिशेने वाटचाल सुरु आहे .
कुटुंबव्यवस्था प्रबळ असेल तर राष्ट्र प्रबळ बनेल .ज्या देशात स्त्रीला सन्मान असतो तो देश पुढे जातो असे ते म्हणाले . मतृभाषेतून शिक्षण घेतले तर शिक्षणाचा पाया भक्कम होतो असे ही ते म्हणाले .कुटुंब व्यवस्था डळमळीत होत असल्याने कौटुंबिक हिंसा वाढत असल्याचे ते म्हणाले .
प्रा. बबनराव उकिर्डे यांनी सांगितले
आयटीआय शिरुरच्या समस्या सोडविण्यास कटिबध्द असल्याचे ते म्हणाले . आयटीआयतून कुशल मनुष्यबळ निर्माण करायचे आहे .राज्यातील आयटीआयला वेगळी ओळख करुन देण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे .
कार्यक्रमाचा सुरुवातीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवराज्यभिषेक दिनाचा संदेश दाखविण्यात आला .
याप्रसंगी अमित परदेशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गीत सादर केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश पवार यांनी केले .सूत्रसंचालन संतोष झंजाड यांनी केले आभार माधव गायकवाड यांनी मानले .