Uncategorized

शिरूर पोलीस स्टेशन व प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा अभियान मार्गदर्शन शिबीर

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
अपघाताचे प्रमाण रोखण्या संदर्भातील जनजागृती करिता शिरूर पोलीस स्टेशन व प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा अभियान मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि सुरक्षित वाहन चालवण्याबाबत जनजागृती करण्यासाठी शिरूर येथे रस्ता सुरक्षा अभियान मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले , सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर येथे वाहन चालक परवाना शिबीर साठी उपस्थित असलेल्याना अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार व वाहतूक पोलीस हवालदार वाघमोडे , अनिल जाधव यांनी प्रबोधन केले.
तसेच मोटार वाहन निरीक्षक कृष्णात बामणीकर, संतोष गांगर्डे यांनी
“*राहवीर*” (Good Samaritan)याबद्दल विस्तृत माहिती दिली तसेच राहवीर पुरस्काराची रक्कम पाच हजार रुपये वरून पंचवीस हजार रुपये झाली असल्याची माहिती दिली

अपघात झाल्यानंतर तातडीने अपघातग्रस्तास मदत झाली तर वेळेवर उपचार सुरू होऊन संबंधित अपघातग्रस्ताचा जीव वाचू शकतो “गोल्डन अवर ” मध्ये अपघातग्रस्ता मदत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. सुरक्षा,वाहतुकीचे नियम, हेल्मेट, सीटबेल्ट ची आवश्यकता. वाहन चालविताना मोबाईल चा वापर न करणे,मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले व रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा संदर्भात सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. . यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रियांका गडेकर व सरला सूर्यवंशी, शाखा अभियंता बाबासाहेब गाडेकर,
रामलिंग मोटार ड्रायव्हिंग स्कुल शिरुर च्या संचालिका पुष्पक केवटकर व शिरुर परिसरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक चालक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button