विशेष
प्री वेडिंग फोटोशूट ला फाटा देत शिरुर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ संचालित मनशांती छात्रालयास मदत
छात्रालयातील विद्यार्थ्याना संपूर्ण अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर व 42 इंच टीव्ही कॅरम बोर्ड बॅडमिंटन किट चेस बोर्ड व स्नेहभोजन देऊन योगेश पंदरकर व सीमा निभोरे यांनी घालून दिला आदर्श
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम ) प्री वेडिंग फोटोशूट ला फाटा देत शिरुर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ संचालित मनशांती छात्रालयातील विद्यार्थ्याना संपूर्ण अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर व 42 इंच टीव्ही कॅरम बोर्ड बॅडमिंटन किट चेस बोर्ड व स्नेहभोजन देऊन योगेश पंदरकर व सीमा निभोरे यांनी नवा आदर्श घालून दिला आहे .



अलीकडील काळात प्री-वेडिंग संकल्पना समाजामध्ये सुरू आहे. यासाठी लग्न जमलेले तरुण-तरुणी मोठा खर्च करतात. लग्नाआधी फोटोग्राफर घेऊन फोटोशूट केले जाते या संकल्पनेला फाटा देऊन श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील योगेश रामभाऊ पंदरकर व सीमा राजेंद्र निंभोरे यांनी शिरूर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ संचालित मनशांती छात्रालयाला भेट देऊन या छात्रालयातील अनाथ व निराधार मुलांसाठी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व सेमी इंग्लिश संपूर्ण अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर व 42 इंच टीव्ही तसेच कॅरम बोर्ड बॅडमिंटन किट चेस बोर्ड व स्नेहभोजन दिले . याप्रसंगी दोन्ही परिवारातील सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मन शांती छात्रालयाचे प्रकल्प व्यवस्थापक सचिन ढोरमले यांनी केले.या वेळी संस्थेचे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ यांनी दोन्ही कुटुंबाचे आभार मानले असाच आदर्श समाजातील सर्व तरुणांनी घेऊन समाजामध्ये अनाथ असलेल्या मुलांसाठी कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली .
याप्रसंगी अहिल्यानगर येथील शिक्षक नेते अविनाश निंभोरे , पिंपळगाव पिसा येथील सावित्रीबाई कला महाविद्यालयातील प्रा. बाबासाहेब पंदरकर , व दोन्ही कुटुंबाचे सदस्य उपस्थित होते.
