Uncategorizedविशेष

शर्विन संजीव पलांडे यांचा दशक्रिया विधी शनिवार दि .१९ एप्रिल २०२५ रोजी मुखई येथे

शर्विन हे माजी आमदार काकासाहेब पलांडे यांचे नातू तर अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांचे चिरंजीव

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम )शर्विन संजीव पलांडे वय -२१ यांचे नूकतेच निधन झाले . शर्विन यांच्या दशक्रिया विधी शनिवार दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी मुखई , ता . शिरुर येथे होणार आहे .
शर्विन यांचे रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी मुंबई येथे अकस्मात निधन झाले . कायदा या विषयात त्यांचे शिक्षण सुरु होते . तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत उर्फ काकासाहेब गुलाबराव पलांडे यांचे ते नातू होत . तर अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांचे ते चिरंजीव होत . आज ( शुक्र .१८ एप्रिल )  माजी मंत्री दिलिपराव वळसे पाटील यांनी पलांडे कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले . शर्विन यांच्या अकस्मिक  निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .
पलांडे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक मुखई येथील निवासस्थानी येत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button