जबरी चोरी च्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखे कडून उकल करण्यात येवून जबरी चोरी करणारास जेरबंद
शिरुर दिनांक ( वार्ताहर ) जबरी चोरी च्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखे कडून उकल करण्यात येवून जबरी चोरी करणारास जेरबंद करण्यात
करण्यात आले आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर पोलीस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता . गुन्ह्यातील फिर्यादीस काम देतो असे म्हणून दोन अज्ञात आरोपीनी फिर्यादीचेच गाडीवर बसून जाऊन गाडी थोडे अंतर पुढे गेल्यावर कच्चा रोडने घेऊन जाऊन फिर्यादीला लघवी साठी गाडी थांबवण्याचा बहाना करून गाडी थांबवण्यास सांगून फिर्यादीस हाताने मारहाण करून ढकलून देऊन फिर्यादीची टीव्हीएस ज्युपिटर मोटरसायकल तसेच मोबाईल असा एकूण 35000/- रु चा मुद्देमाल हा बळजबरीने काढून घेऊन गेले होते .
सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करत असताना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीचे आधारे सदरचा गुन्हा मारुती मसाराव मस्के वय 23 रा कुंभारी ता पुसद जि यवतमाळ यांने त्याचा विधीसंघर्षित साथीदार याचे साथीने केला असल्याचे समजल्याने त्यांना सापळा लावून ताब्यात घेण्यात आले .त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल हा जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधिक्षक रमेश चोपडे ,पोलीस उपअधिक्षक प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली स्था. गु शाखे चे पो. नि अविनाश शिळीमकर, पो, हवा, तुषार पंदारे,पो.हवा. जनार्धन शेळके,पो. हवा. संजू जाधव ,पो. हवा .राजू मोमीन यांनी केली.