शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम )
शर्विल पलांडे यांच्या निधनाने जवळचा मित्र गमाविल्याची भावना आमदार रोहित आर पाटील यांनी व्यक्त केली .
शर्विन संजीव पलांडे यांचे रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी मुंबई येथे अकस्मात निधन झाले . कायदा या विषयात त्यांचे शिक्षण सुरु होते . तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत उर्फ काकासाहेब गुलाबराव पलांडे यांचे ते नातू होत . तर अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांचे ते चिरंजीव होत .

दशक्रिया विधीच्या वेळी श्रध्दांजली अर्पण करताना माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव आमदार रोहित पाटील म्हणाले की माजी उपमुख्यमंत्री आर . आर . पाटील यांचे माजी आमदार काकासाहेब पलांडे यांच्याशी स्नेहाचे संबंध होते . कायदाचे शिक्षण घेत असलेल्या शर्विन यांना कायदासह विविध विषयात गती होती . त्यांच्या निधनाने आपण एक उमदा युवक सहकारी मित्र गमाविल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली .
यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके , आमदार बापूसाहेब पठारे , माजी आमदार विलास लांडे , माजी आमदार ॲड अशोक पवार , सनदी आधिकारी अमोल तांबे , प्रा . चौधरी, डॉ . सावंत तसेच निळोबाराय देवस्थानचे अशोक सावंत यांनी श्रध्दांजली अर्पण केली .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, आयपीएस दीपक साकोरे , यशदाचे ॲडिशनल डायरेक्टर शेखर गायकवाड , सनदी आधिकारी कांतीलाल उमाप , माजी कुलगुरु डॉ . पंडितराव पलांडे , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंधर कामठे , जिल्हा बॅकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे डीवायएसपी अनिल कटके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .हभप रसाळ महाराज यांचे प्रवचन यावेळी झाले . विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरीक यावेळी उपस्थित होते .
