Uncategorizedशैक्षणिक

रोटरी क्लब पुणे यांच्या वतीने आयोजित स्पर्धेत सी. टी . बोरा कॉलेजच्या दोन गटात प्रथम क्रमांक

शिरूर दिनांक ( वार्ताहर )
रोटरी क्लब पुणे यांच्या वतीने आयोजित भूपृष्ठ जल आणि हवा पृथःकरण या दोन गटामध्ये चांदमल ताराचंद बोरा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला आहे .
चांदमल ताराचंद बोरा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये रोटरी क्लब पुणे यांच्या डिजिटल पाणी व्यवस्थापन प्रोजेक्टसाठी सरदवाडी हे गाव दत्तक घेण्यात आले होते.रोटरी क्लब पुणे यांच्या वतीने ही स्पर्धा ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने राबविण्यात आली. त्यामध्ये विविध २६ शाळा व महाविद्यालय सहभागी झालेले होते. बोरा महाविद्यालयाने जल संवर्धन तसेच मृदा व जल पृथःकरण अशा दोन कार्यशाळा घेतलेल्या होत्या. सदर गावच्या प्रकल्पाची अंतिम स्पर्धा व निकाल इंद्रधनुष्य सभागृह पुणे येथे संपन्न झाली. त्यात भूपृष्ठ जल आणि हवा पृथःकरण या दोन गटामध्ये चांदमल ताराचंद बोरा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू व जलानायक डॉ. सतीश खाडे यांच्या हस्ते महाविद्यालयाला परितोषिक प्रदान करण्यात आले. ग्रीन क्लबचे निवडक ३० विद्यार्थी आणि डॉ. अतुल जेठे यांनी सदर गावचा मान्सूनपूर्व व मान्सुनोत्तर अशा दोन सत्रात भूपृष्ठ जल, मृदा, भूमिगत जल, जलसिंचणासाठी वापरण्यात येणारे पाणी, पेय जल, हवा यांचे पृथःकरण केलेले होते.
सरदवाडी ग्रामस्थांनी वरील उपक्रम व पुरस्काराची दखल घेत पंचायत समितीचे माजी सदस्य आबासाहेब सरोदे, उपसरपंच गणेश सरोदे व माजी नगरसेवक प्रविण दसगुडे यांनी ग्रामस्थाच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या उपस्थितीत महाविद्यालायाचे प्राचार्यडॉ. के. सी. मोहिते यांचा सत्कार केला.
प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button