Uncategorizedराष्ट्रीय

मुंबई येथील जैन मंदिर उध्वस्त करणा-या अधिका-यांवर कार्यवाही करुन जैन मंदिर पूर्ववत निर्माण करुन द्यावे

सकल जैन समाज शिरुर यांची शासनाकडे मागणी

शिरुर दिनांक ( वार्ताहर ) विलेपार्ले , पुणे ,मुंबई येथील दिगंबर जैन मंदिर उध्वस्त केलेल्या महानगरपालिकेच्या अधिका-यांना समज देवून तातडीने जैन मंदिर पुर्ननिर्माण करावे अशी मागणी सकल जैन समाज शिरुर व विविध संस्थाचा वतीने शासनाकडे देण्यात आली आहे .
याबाबतचे निवेदन जैन समाजाचा वतीने प्रांताधिकारी आहेर यांना देण्यात आले . यावेळी संघपती भरत चोरडिया , जैन युवा परिषदचे प्रकाश बाफना , कपिल बोरा , सुनील बोरा , माजी मुख्याध्यापक अनिल जैन , बॅकेचे माजी आधिकारी नंदकुमार पिंजरकर आदी यावेळी उपस्थित होते .
निवदेनात म्हटले आहे की मुंबई महानगरपालिकेने दि. १६ एप्रिल २०२५ रोजी विलेपार्ले पुर्व मुंबई येथील दिगंबर जैन मंदिर कोणतेही पुर्वसुचना न देता पाडल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. उच्च न्यायालय मुंबई यांनी स्थगिती दिली असतांना दबावामुळे व आमिषाला बळी पडून घाईघाईने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंदिर जमीनदोस्त करुन अल्पसंख्याक जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. जैन मंदिर, तीर्थक्षेत्र, स्थानक हे भारतीय संस्कृतीचे भूषण आहे. जैन समाजाने देशाच्या उन्नतीसाठी कायमच बहुमोल योगदान दिलेले आहे. जैन समाज शांतताप्रिय अंहिसक व कोणालाही न दुखवता भक्तीभावाने व श्रध्देने पूजा अर्चा करतो अशा अल्पसंख्यांक जैन समाजाचे उपासना स्थळ जमीनदोस्त करुन उध्वस्त करणे हे शासनास व प्रशासनास शोभनीय व समर्थनीय कार्य नाही. या घटनेची शिरुर येथील सकल जैन समाज व जैन संघटना जाहीर निषेध करीत आहे. जैन मंदिर उध्वस्त करणा-या अधिका-यांवर कार्यवाही करुन जैन मंदिर पूर्ववत निर्माण करुन द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून निवेदनावर
संघपती,श्री. वर्धमान स्थानकवासी, जैन श्रावक संघ घोडनदी , सतिश धाडीवाल अध्यक्ष श्री. गोडीजी पार्श्वनाथ श्वेतांबर जैन टेंम्पल ट्रस्ट,श्री. वासुपूज्य स्वामी श्वेतांबर जैन टेंम्पल ट्रस्ट अध्यक्ष, , सकल दिगंबर जैन समाज शिरुर,
श्री. पार्श्वनाथ प्रतिष्ठान,श्री. तिलोक पारमार्थिक चॅरीटेबल, ट्रस्ट,श्री. गोरक्षण पांजरपोळ संस्था शिरुर,श्री. महावीर की रोटी,सन्मती महिला मंडळ शिरुर,श्री. गौतम लब्धी फाऊंडेशन,
आखिल भारतीय स्थानकवासिय जैन कॉन्फरन्स,श्री. गोडीजी पार्श्वनाथ, महिला मंडळ आदी संस्थाच्या पादाधिकारी यांच्या सह्या आहेत .

 

O

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button