राजकीयराष्ट्रीयविशेष

शिरूर नगरपरिषद प्रभाग निहाय आरक्षण जाहीर

कही खुशी तर कही गम.

  1. शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24} दिवाळीच्या पार्शवभूमी वर नगरपरिषद निवडणूक पडघम सुरु झाल्याने यंदाची मतदार राजाची दिवाळी जोरात होणार असे बोलले जात आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणारे अनेक जण मतदारांन पर्यत पोहचण्यासाठी अनेक क्युलपत्या करत असून गणेश उत्सव, नवरात्र,विविध खेळाच्या स्पर्धा दणक्यात झाल्या असून काहीनी मतदाराना देवदर्शन व निसर्ग पर्यटन ही घडवून आणले आहे. इच्छुकांचे मतदारांना राम राम व दररोज सोशल मिडीया वरील शुभ संदेशही वाढले आहेत.

अर्थात निवडणूक लढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असणा-या इच्छुकांचे प्रभाग आरक्षण सोडती कडे लक्ष लागून राहीले होते.
मागील चार वर्षापासून रखडलेल्या नगरपरिषद निवडणूक होण्याचा प्रक्रियेच्या भाग म्हणून मुंबई येथे नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्या नंतर आज प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाले आहे. काही ठिकाणी इचछुक असणा-यांचे प्रभाग आरक्षित झाल्याने काहीच्या इच्छावर पाणी फेरले गेले आहे. तर काही महत्वाच्या नेत्यांचे प्रभाग खुले झाल्याने त्याच्या मनात खुशीचे लाडू फुटले आहे.
साहजिकच काही ठिकाणी ख़ुशी तर काही ठिकाणी गम अशी परिस्थिती निर्माण झाली.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर काहींनी आपल्या पत्नी,भगिनी,मुली यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
शिरूर नगर परिषदेची नगरसेवक संख्या 21 वरून 24 अशी झाली आहे. तीन नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे. शिरूर नगर परिषदेच्या हद्द वाढीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. कदाचित यंदाच्या निवडणुकीनंतर पुढील निवडणुका या शिरूर नगर परिषदेच्या वाढलेला हद्दीनुसार होतील असे बोलले जाते. त्यामुळेही या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.
शिरूर नगरपरिषदेच्या रसिकलाल धारिवाल सभागृहात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. प्रांताधिकारी पुनम अहिरे, मुख्याधिकारी प्रीतम पाटील, कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ,पंकज काकड, चंद्रकांत पठारे, विनोद उबाळे, आदी यावेळी उपस्थित होते.
सन 2011 नुसार शिरूर शहराची एकूण लोकसंख्या ३७३११ इतकी असून त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ४६१३ तर अनुसूचित जमाती १००८ इतकी आहे. प्रत्येकी 12 प्रभागातून दोन नगरसेवक असे 24 नगरसेवक निवडून जाणार असून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे .
प्रभाग निहाय आरक्षण पुढील प्रमाणे
प्रभाग क्रमांक -१ { कामाठीपुरा, कैकाडी आळी, साळुंखे आळी, रम्यनगरी, प्रोफेसर कॉलनी, ढोर आळी, कुंभार आळी, मुंबई बाजार } –
सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण

प्रभाग क्र -२ { कुंभार आळी, कुरेशी मोहल्ला, मदारी वस्ती, इस्लामपूरा, हल्दी मोहल्ला, बुरुड आळी, मुंबई बाजार} – ओबीसी महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्र -३ { सोनार आळी, मारूती आळी, अष्टविनायक सोसायटी, खांडरे आळी, भाजी बाजार, फकीर मोहल्ला,
लाटे आळी, भाजी बाजार, सुभाष चौक, हलवाई चौक } – ओबीसी, सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र -४ { सरदार पेठ, मारुती आळी, चर्च, आंबेडकर नगर, सुशीला पार्क, खारा मळा, पाचारणे मळा, सूरज नगर }- अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्र -५ { महादेव नगर, जोशीवाडी, विठ्ठल नगर, पोलीस लाईन, स्टेट बँक कॉलनी } – सर्वसाधारण महिला,सर्व साधारण
प्रभाग क्र -६ { गणेश नगर, गुजर कॉलनी, बागवान नगर, स्टेट बँक कॉलनी } – ओबीसी महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्र -७{ यशवंत कॉलनी, रयत शाळा सैनिक सोसायटी, जिजामाता सोसायटी, शिवाजी सोसायटी, रेव्हन्यू कॉलनी, करंजुळे वस्ती }- ओबीसी, सर्वसाधारण महिला
प्रभाग -८ { डंबेनाला, आडत बाजार, कापड बाजार, राम आळी, मारूती आळी, सरदार पेठ, रेव्हन्यू कॉलनी, शांती नगर }- ओबीसी महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्र -९ { साई नगर, काची आळी, सय्यदबाबा नगर, संजय नगर, सिद्धार्थ नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती }- अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र १० { नवीन मार्केट यार्ड, वाडा वसाहत, गोपाळ वस्ती, छत्रपती कॉलनी, इंदिरा नगर, बीसी सोसायटी, इसवे नगर, पाबळ फाटा }- अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्र -११ { कामाठी पुरा, एस. टी कॉलनी, प्रीतमप्रकाश नगर, पवार मळा, मंगलमूर्ती नगर} – अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्र -१२ { हुडको कॉलनी, बोरा कॉलेज, बाफना मळा, दिघे मळा }-
ओबीसी व सर्वसाधारण महिला
यावेळी शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, काँग्रेस आय चे शहराध्यक्ष किरण आंबेकर,नगरपरिषदेचे माजी सभापती अभिजित पाचर्णे शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर थोरात, शिवसेना{ ठाकरे } शहरप्रमुख संजय देशमुख, सुनील जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार, माजी नगरसेवक सचिन धाडीवाल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी,हाफिज बागवन, राहील शेख,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, आदित्य मैड, अविनाश घोगरे, माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे,प्रवासी संघटनेचे अनिल बांडे, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोज सय्यद, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सानप, शैलेश जाधव,प्रितेश फुलडाळे, बाळासाहेब आवारी,भूमिपुत्र प्रतिष्ठानचे सुशांत कुटे भाजपचे उमेश शेळके, नवनाथ जाधव,अविनाश जाधव त्याच बरोबर जयवंत साळुंखे व अजीम सय्यद, संतोष थेऊरकर ,आदी उपस्थित होते
चौकट
आरक्षण सोडत काढण्यासाठीच्या चिठठीच्या आकारा वरून व बरणीतील चिठठी फिरवण्यावरून राजकीय पक्षाच्या काही कार्यकर्त्यानी आक्षेप घेतला. रोल चिठी ऐवजी तीची घडी करावी अशी काही नी मागणी केली. त्याच बरोबर सोडत काढणीची बैठक ११ ला सुरु होणे अपेक्षित असताना साडेअकराला सुरु झाल्याबद्दल ही काहीनी नाराजी व्यक्त केली.
पालिकेवर महिलाराज येत असले व नगराध्यक्षपद ओबीसी महिला करिता राखीव असून ही आज सोडतीचा दिवशी एक ही महिला उपस्थित नव्हत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button