Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहरातील ऐतिहासिक पाच कंदील चौकाचे सध्या नूतनीकरणाचे काम चालू असून या पाच कंदील चौकस स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी तसेच महाराष्ट्र केसरी रघुनाथ दादा पवार यांचा यथोचीत सन्मान शिरूर नगर परिषदेने करावा अशी मागणी मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांना निवेदन देऊन करण्यात आली.
अनेक नेत्यांच्या सभा झाल्या असल्या तरी या चौकाला बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेने एक नवीन स्वरूप दिले त्यामुळे या चौकाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे ही मागणी जानेवारी 2025 रोजी मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती तसेच शिरूर शहरातील नामवंत मल्ल
महाराष्ट्र केसरी रघुनाथ दादा पवार यांनी भारतासाठी सुवर्णपदक मिळवून दिले तसेच अनेक कुस्ती क्षेत्रात अनेक मल्ल घडवले आणि महाराष्ट्र केसरीचा पुणे जिल्ह्यातील पहिला मान रघुनाथ दादा पवार यांना मिळाला असून त्यांनी शिरूर शहराचे नाव देशात पोहोचवले असून पन्नास वर्षांपूर्वी मिळालेले पदक हे
शिरूर शहरासाठी कौतुकास्पद असून त्यामुळे शिरूर शहराच्या वतीने शिरूर नगर परिषदेने त्यांचा यथोचीत सत्कार करावा अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच यासाठी नगर परिषदेने ठराव करावा यासाठी व या ठरावाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक नितीन पाचर्णे यांना सुद्धा मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे 