राष्ट्रीयविशेषशैक्षणिक

सार्थ अतुल बोथरा सी . ए . ची परीक्षा उत्तीर्ण

शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
येथील सार्थ अतुल बोथरा यांनी  सी.ए. ( सनदी लेखापाल) ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
सार्थ हे यशवंत वसाहतीतील बांधकाम व्यावसायिक अतुल बोथरा यांचे चिरंजीव आहेत तर कांतीलाल बोथरा यांचे नातू आहेत.
नियमित अभ्यास, सातत्य , त्याचबरोबर सकारात्मवृती व कुटुंबातील सर्व सदस्यांचे पाठबळ व मार्गदर्शन यामुळे सीए सारखी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सार्थ यांनी सांगितले. आई-वडिलांनी शिक्षणाला दिलेले प्रोत्साहन त्याचबरोबर शालेय जीवनापासून सी.ए होण्याचे बाळगलेले स्वप्न व ते पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास ,शिस्त यामुळे सीए ची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले अशी भावना त्याने व्यक्त केली.
सी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सार्थ अतुल बोथरा   यांचे विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button