Uncategorized
म्हाडाची वृक्षरोपनाची पुणे जिल्ह्यातील मोहिम रामलिंग येथून सुरु. म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळाराव यांचा हस्ते वृक्षारोपन

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा ) चा वतीने संपूर्ण राज्यात ३० हजार वृक्ष लावण्यात येणार असून पुणे जिल्ह्यातील वृक्षारोपनाची मोहिम रामलिंग (शिरुर ) येथे वनमहोत्सव अंतर्गत देशी झाडांचे वृक्षारोपन करुन पुणे म्हाडाचे सभापती व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या हस्ते करण्यात आली .
यावेळी रामलिंगचा सरपंच शिल्पा गायकवाड , श्याम राऊत,तर्डोबावाडीचे सरपंच जगदिश पाचर्णे , म्हाडाचे कार्यकारी अभियंता वाबळे ,सहाय्यक अभियंता प्रफुल्ल लोखंडे ,अभियांत्रिकी स्थापत्य सहाय्यक राहूल नवले ,माजी सरपंच अरुण घावटे ,
माजी उपसरपंच बाबाजी वर्पे ,अनिल लोंढे , शिरुर नगरपरिषद माजी सभापती विठ्ठल पवार , शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात , संतोष वर्पे ,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव घावटे , जगन्नाथ पाचर्णे , बलदेवसिंग परदेशी , बबनराव कर्डिले , पोपटराव दसगुडे , सुजाता पाटील आदी यावेळी उपस्थित होते .
आढळराव म्हणाले म्हाडासाठी राज्याने ३० हजार झाडे लावण्याचे उद्दीष्ट दिले असून रामलिंग येथील वृक्षारोपण पासून पुणे जिल्ह्यातील वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. शिरुर येथील कचरा डेपो जवळील जागा , बीएसएनएल कार्यालया जवळील जागा व रामलिंग अश्या ठिकाणी 650 वृक्ष लावण्यात येणार आहे.

