विशेष

आषाढी एकादशीनिमित्त शिरुर मध्ये विविध शाळांच्या दिंडी सोहळा रंगला

शिरूर दिनांक ( वार्ताहर ) शहरातील विविध शाळांनी आषाढी एकादशी निमित्त शिरूर शहरात दिंडीचे आयोजन केले होते. त्यामुळे संपूर्ण शहर परिसर भक्तीभाव व हरिनामाचा गजरा मध्ये रमून गेला होता. ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष व हाती टाळ घेतलेले बाल वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर च्या प्रांगणात वारीनिमित्त पालखीचे रिंगण सोहळाचे आयोजन करण्यात आले होते .
पूर्व प्राथमिक विभाग व प्राथमिक विभाग इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात विठ्ठल नामाच्या गजरात रिंगण सोहळा पूर्ण केला.त्याच वेळी पाउसाने लावलेली हजेरी व भजनामुळे आधिक उत्साह निर्माण झाला . जणू पंढरपुरच शाळेच्या प्रांगणात अवतरले होते. चिमुकल्या वारकऱ्यांसोबत पालकांनीही ताल धरला होता.
पूर्व प्राथमिक विभाग व इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाची शाळा भरली हे गीत गायले तर तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.
यावेळी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे व शालेय समितीचे अध्यक्ष अनिल बोरा, संस्थेचे सचिव नंदकुमार निकम , तसेच संस्थेचे सदस्य धरमचंद फुलफगर, शिरीष बरमेचा, राजेंद्र भटेवरा, प्रशासकीय अधिकारी संजय देशपांडे व विद्याधाम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुरुदत्त पाचर्णे व शाळेच्या प्रचार्या अश्विनी घारू उपस्थित होते .
आकांक्षा स्पेशल चाईल्ड स्कूल मध्ये ही पालखी दिंडी सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .यावेळी भजन व अभंगाचे सादरीकरण प्रसिध्द गायक गणेश मराठे , डॉ. शिल्पा घोडे, सुषमा झावरे , डॉ . नूतन क्षीरसागर क्षीरसागर यांनी केले .यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ऱाणीताई चौरे , सरदवाडीचे उपसरपंच सोमनाथ सरोदे , सतिश केदारी , उपस्थित होते .

विशेष मुलांनी व पालकांनी पायी पालखी दिंडी काढली व विठूनामाच्या गजर करत फुगडी खेळत, गाण्यांवर ताल धरत सहभाग घेतला .
जीवन विकास मंदिर संस्थेचा विद्यार्थ्यानी कुकडी वसाहतीतील शाळेतून पालखी व दिंडी सोहळा काढला . विठूनामाचा गजरासह पर्यावरणासरंक्षणाचा  संदेश बाल वारक -यांनी यावेळी दिला . कृषिलोक विकास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक , मुख्याध्यापक गंगाधर तोडमल यावेळी उपस्थित होते .

oplus_131074


बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, रामलिंग रोड, शिरूर, संचलित बालाजी इंग्लिश मिडियम स्कुल तसेच बालाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सेमी इंग्लिश या दोन्ही विदयालयांच्या वतीने दिंडी सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. बालाजी शैक्षणिक संकुल रामलिंग रोड-पाबळ फाटा-काची आळी -अण्णाभाऊ साठे चौक एस.टी. बस स्थानक पाच कंदील चौक माणिकचंद रुग्णालय ग्रामीण रुग्णालय- रयत शाळेचे मैदान या मार्गाने ही दिंडी गेली .
रयत शाळेचा मैदानावर दिंडीची सांगता झाली . कापड बाजार येथील पाच कंदिल चौकात पालखीचे स्वागत व आरती प्रसिध्द उद्योगपती व माजी नगरध्यक्ष प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार , माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे , मुख्याध्यापक विनायक म्हसवडे , मुख्याध्यापक मनमित चौरे ,आदी उपस्थित होते .

डेक्कन स्कूल मध्ये रंगला पालखी रिंगण सोहळा
आषाढी एकादशी च्या पूर्व संध्येला येथील डेक्कन स्कूल च्या प्रांगणात भक्तिमय वातावरणात पालखी व रिंगण सोहळा पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची पूजा करून पालखीस सुरवात झाली. अग्रभागी लेझीम पथक , टाळ मृदंगाच्या तालावर विठ्ठलाचा जयघोष करणारे विद्यार्थी, पांडुरंग, रखुमाई , वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान केलेले ५०० विद्यार्थी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. प्रदक्षिणा करून पालखी सोहळा पुन्हा शाळेच्या आवारात आल्यावर इयत्ता ८ व ९ वी च्या विद्यार्थ्यांनी पालखीभोवती रिंगण तयार केले. झिम्मा, फुगडी, पिंगा आदी पारंपरिक नृत्य सादर करीत रिंगण सोहळ्यात रंगत भरली. या वेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. इयत्ता ५वी व ८ वी तील विद्यार्थ्यांनी भारुड सादर केले. स्वरूप बारी या विद्यार्थ्याने भजन सादर केले. यश दिवेकर, सखाराम पुरी, संगीता कुलवंत आदींनी साथ संगत केली. शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य  व्हि. डि. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी सौ. शोभना कुलकर्णी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी  जिल्हा परिषद माजी सदस्या  कोमल वाखारे, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे , शिक्षक प्रतिनिधी जयश्री दांडगे, समन्वयक डायना बोर्डे आदी  उपस्थित होते. मुख्याध्यापक डॉ. ओंकार यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी बनविलेले १००० शेंगदाणा लाडू प्रसाद म्हणून वितरित करण्यात आले. शाळेतील शिक्षिका अक्षता दिवेकर, शितल ढवळे, अश्विनी पिंगळे , शिक्षक अमोल वाघमारे, सखाराम पुरी, चंद्रकांत झांजे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. जयश्री दांडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button