Uncategorizedधार्मिंकविशेष

चातुर्मास करीता जैन धर्मगुरु गौतम मुनीजी महाराज व चेतन मुनीचे महाराज यांचे मिरवणूकीने शिरूर शहारात आगमन

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)’भगवान महावीर स्वामी की जय , ‘जैन धर्म की जय ‘ च्या जयघोषात शिरूर शहरात चातुर्मासाकरिता जैन संत खान्देश केसरी , महाराष्ट्र गौरव प. पू. श्री गौतममुनिजी म.सा. व यादववाडी गावचे सुपुत्र जैन संत प.पू.श्री चेतनमुनिजी म.सा. यांनी प्रवेश केला.

 

यशवंत वसाहतीतील राहुल बोथरा यांच्या घरापासून पदयात्रेने गौतम मुनी व चेतनमुनी यांनी शिरूर शहरात चातुर्मासाकरिता प्रवेश केला. यशवंत वसाहत पासून सुरु झालेली ही पदयात्रा मुलकी वसाहत , मार्गे रामआळीतून कापड बाजार मार्गे श्री . वर्धमान जैन स्थानकात पोहोचली . पदयात्रेत जैन ध्वज घेऊन अनेक जण सहभागी झाले होते.

श्री. वर्धमानस्थनाका जवळ पदयात्रेची सांगता झाल्यावर धर्मसभा मंडपात गौतममुनी व चेतनमुनी यांचे व्याख्यान झाले . चातुर्मास निमित्त गृरु महाराज यांच्या स्वागत निमित्त यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले . प्रसिध्द उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल यांचे ही यावेळी मनोगत झाले.
राज्यातील विविध तालुक्यातून जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील विविध जैन महिला मंडळांनी स्वागत गीत गायले..
संघपती भरतजी चोरडीया यांनी स्वागत केले , मंत्री वसंत गादिया यांनी सूत्रसंचालन केले तर राहुल बोथरा , निलेश संघवी , माजी नगरसेवक विजय दुगड आदी यावेळी उपस्थित होते .

oplus_131074

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button