Uncategorizedविशेष

शिवजयंतीनिमित्त द मदर ग्लोबल फाउंडैशन , बालाजी इंग्लिश स्कूल , बीजे कॉर्नर जाधव मळा व रेव्ह्न्यू कॉलनी येथे अभिवादन

शिवजयंती निमित्त शहरात मोठा उत्साह

 


शिरुर दिनांक ( वार्ताहर ) पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या द मदर ग्लोबल फाउंडैशनचा माईनगरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व देवेंद्र धुमाळ यांच्या जयंतीनिमित्त ह.भ.प. नवनाथ महाराज माशेरे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले .
यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी सभापती नोटरी देवराम धुमाळ , सुनिता धुमाळ , जयश्री धुमाळ ,बोरा महाविद्यालयाचा भुगोल विभागाचे माजी प्रमुख प्रा . चंद्रकांत धापटे , डॉ . मोनिका धापटे , संस्थेचे सचिन ढोरमले , मीनाक्षी लंटाबळे , यश सूर्यवंशी आदी उपस्थित होते .


माशेरे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते . कुशल प्रशासक होते . लोककल्याणकारी कारभार त्यांनी केला . संकटास न घाबरता सामोरे गेले . शिवाजी महाराज यांचे शौर्य , पराक्रम , प्रशासन ,अर्थकारण याचा अभ्यास विद्यार्थ्यानी करावा असे आवाहन त्यांनी केले .
देवराम धुमाळ यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला .ते म्हणाले व्यवसायिक देवेंद्र धुमाळ यांच्या कोरोना काळात अचानक मृत्यु झाला सामाजिक कार्यात देवेंद्र सातत्याने पुढाकार घेत . त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्याचा कार्यक्रम दरवर्षी सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेतील मुलांसमवेत करण्यात येतो .प्रा . चंद्रकांत धापटे यांनी आभार
मानले .

समस्त मराठा समाज यांच्या वतीने रेव्ह्न्यू कॉलनीत वैशाली अनिल गायकवाड यांनी शिवजयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते . यावेळी आखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे , उद्योजिका वर्षा काळे (पोटावळे ) , शशिकला काळे .जनता दलाचे नेते संजय बारवकर , प्रा . सतीश धुमाळ , रमेश दसगुडे , नीलेश नवले , महेंद्र ढेरे , भरत ढाके , वैशाली ठुबे , प्रिया बिरादार , रश्मी क्षीरसागर , रेश्मा शेख , राजू शेख आदी उपस्थित होते .
पुणे अहिल्यानगर रस्त्यावरील जाधव मळा येथे ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सचिनराजे जाधव , श्रीकांतराजे जाधव यांनी अभिवादन केले .
बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली .
स्कूल ने शिवजयंती निमित्त विविध उपक्रम राबवले.
कार्यक्रमाची सुरुवात ही शिवरायांच्या पालखी आगमनाने झाली. विद्यार्थ्यांनी ढोल ताशे वाजवत लेझीमच्या तालावर पालखीचे स्वागत केले. स्वागतावेळी केलेल्या शिवगर्जना व ढोल ताशे यांच्या आवाजामुळे अवघा रामलिंग परिसर दुमदुमला. विद्यार्थी शिवाजी महाराज व जिजाऊंच्या वेशभूषेत आले होते . कार्यक्रमाचे आकर्षण ठरली ती विद्यार्थ्यांनी केलेली घोडे स्वारी.
याचबरोबर तलवारबाजी, लाठीकाठी, दानपट्टा ,शिवकालीन युद्धकला आदींचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले.
ढोल ताशांच्या गजरात पोवाडा, शिव गीत तसेच बालचमुनी सादर केलेला शिव पाळणा नृत्य आणि महाराजांच्या शौर्यपर भाषणांनी शिवरायांच्या स्मृती पुन्हा उजळल्या. संस्थेचे चेअरमन सदाशिव अण्णा पवार आणि मुख्याध्यापक मनमित चौरे यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली अनंतवार व विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन स्कूलच्या उपप्राचार्या प्रणिता शेळके यांनी केले.

 

पदमश्री सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत शिवजयंती निमित्त अभिवादन
पदमश्री सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत शिवजयंती निमित्त अभिवादन
जाधव मळा येथे अभिवादन करताना उद्योजिका वर्षा काळे व वैशाली गायकवाड
जाधव मळा येथे अभिवादन करताना उद्योजिका वर्षा काळे व वैशाली गायकवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button