विशेष
शिरुर येथे शिवजयंतीनिमित्त विविध संस्था संघटनाचा वतीने अभिवादन

शिरुर दिनांक ( वार्ताहर ) छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिरुर येथे विविध संस्था संघटना यांचा वतीने अभिवादन करण्यात आले .
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती शिरुर यांचा वतीने नगरपालिका इमारती जवळ अभिवादन करण्यात आले .

यावेळी माजी आमदार ॲड . अशोक पवार , पांडूरंग थोरात , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार , लोकजागृती संघटनेचे ओमप्रकाश सतीजा , माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे , रामलिंगचा सरपंच शिल्पा गायकवाड , उपसरपंच बाबाजी वर्पे , मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे , मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे ,माजी नगराध्यक्ष नसिम खान कॉग्रेस आयचे अध्यक्ष ॲड . किरण आंबेकर ,भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, मराठा महासंघाचे श्यामकांत वर्पे , संघपती भरत चोरडिया ,लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रमेश कर्नावट , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर
राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष शरद कालेवार , माजी नगरसेवक मंगेश खांडरे , माजी नगरसेविका माया गायकवाड , ॲड . सुप्रिया साकोरे , शिवसेनेचे ज्येष्ठय नेते खुशाल गाडे , श्रेणिक नहार , उत्सव समितीचे नीलेश नहार ,


माजी आमदार ॲड .अशोक पवार म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते . शिव जयंती निमित्त उत्सव समितीचा वतीने शिरुर शहरात धनराज नहार व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते हे कौतुकास्पद असल्याचे पवार म्हणाले .
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीचा समाज एकत्रित कसा राहील हे पाहिले . शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य लोकांपुढे नेण्याचे काम धनराज नहार व्याख्यानमालेचा माध्यमातून केले जाते.
यावेळी प्रास्ताविक डॉ . सुभाष गवारी यांनी केले. सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी केले . आभार ॲड. सुभाष पवार यांनी मानले .यावेळी उपस्थित नागरिकांना खिदमत फाउंडैशनचा वतीने मसाला दूध व पाण्याची बॉटलचे वाटप करण्यात आले .