विहीरीत पडलेल्या बिबट्या जेरबंद
शिरूर दिनांक ( वार्ताहर ),
सविंदणे ता. शिरूर येथील नाथनगर
येथे विहीरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढून त्याला जेरबंद करण्यात आले .


नाथनगर येथे पहाटेच्या सुमारास माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभू सावळेराम नरवडे यांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्या हल्ला करून शेळीला घेऊन जात असताना त्याला विहिरीच्या रिंगचा अंदाज न आल्याने त्यावरून उडी मारून जाताना बिबटया शेळीसह विहिरीत पडला त्याच्या आवाजाने शेजारील शेडमध्ये झोपलेला माणूस जागा झाल्याने त्याने विहिरीची पाहणी करत घडलेला प्रकार नागरिकांना सांगितला .
त्यावेळी रामदास नरवडे यांसह आदींनी विहिरीत डोकावले असता बिबटया विहिरीत जिव वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचे तर शेळी पाण्यात मृत झाल्याची दिसली .
याबाबतची माहिती वनखात्यास
कळविल्यावर दिल्यानंतर शिरुरचे प्रभारी वनपरिक्षेत्र विकास अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीमंडल अधिकारी भानूदास शिंदे, नियतक्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांसह रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिक व ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला पिंजराच्या सहाय्याने सुरक्षित विहिरीतून बाहेर काढले .
दोन दिवसापूर्वी ढोक सांगवी ता. शिरुर येथे वीजेचा धक्का बसून एक बिबट्या मृत पावल्याची घटना घडली .