राष्ट्रीय

कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे व्यवसाय व रोजगाराचे स्वरुप बदलणार : लेखक अच्युत गोडबोले

शिवजयंती व्याख्यान मालेत बोलताना  लेखक अच्युत गोडबोले शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम )
कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे जग बदलणार आहे . रोजगाराचे ,व्यवसायाचे स्वरुप बदलणार असून जे नवीन शिकणार नाहीत ते बाहेर फेकले जातील असा इशारा लेखक अच्युत गोडबोले यांनी दिला .
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती शिरुर यांच्या वतीने आयोजित स्वर्गिय धनराज नहार स्मृति व्याख्यानमालेत ‘ माझा लेखन प्रवास व कृत्रिम बुध्दिमत्ता ‘ या विषयावर लेखक अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान झाले. यावेळी मंचावर मेघालय राज्यातील जिल्हाधिकारी अभिजीत पठारे माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे , ॲड . सुभाष पवार , डॉ .सदानंद गायकवाड , डॉ. अखिलेश राजूरकर , संघपती भरत चोरडिया ,समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक आदी उपस्थित होते .याप्रसंगी लोकजागृतीचे ॲड. ओमप्रकाश सतीजा यांच्या विशेष सन्मान करण्यात आला व गायत्री बोरुडे यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले .
गोडबोले म्हणाले की मी लिहिलेल्या पुस्तकांन मुळे अनेकांचे आयुष्य बदलून गेले . आपल्या जीवन प्रवास उलगडत त्यांनी सांगितले की सोलापूर येथील घरी लहान पासून साहित्यीक कलावंत यांची ये जा असायची. वडिल शिक्षक होते . गणिताची आवड असल्यामुळे रॅग्लर व्हायचे होते. दहावीला असताना बोर्डात १६ व्या क्रमांक आला . त्यानंतरचे शिक्षण पहिली नोकरी ,विविध कंपन्यातील कामाचे अनुभव, त्यांनी सांगितले .
लेखक म्हणून सुरु झालेला प्रवास ही सांगितला . सगळ्या त-हेची आयुष्ये आपण पाहिली. जेथे असेल तिथे एक्सलन्ट राहायचे हा ध्यास राहिला . सतत अभ्यास करत राहिलो . पुस्तके वाचत राहीलो व त्यातुन स्वंत :ला घडवत गेलो .व्यसनाच्या आहारी ही गेलो ,नैराश्य ही आले कधी कधी आत्महत्येचाही विचार आला पण या सर्वांवर मात करुन त्यातून बाहेर पडलो . संगणक , विज्ञान , संगीत , साहित्य , अर्थशास्त्र , मानसशास्त्र या विविध विषयांवर ५६ पुस्तके प्रकाशित झाली असून नव्याने काही पुस्तके प्रकाशित होणार आहेत . किमयागार , मुसाफिरी या त्याच्या पुस्तकावर ही त्यांनी भाष्य केले . सध्या कृत्रिम बुध्दिमत्ते विषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे . कृत्रिम बुध्दिमत्ते मुळे शिक्षक , कवि , साहित्यीक , संगीतकार , वकिल यांचे काय होणार याबाबतही चर्चा आहे . प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे बदल होणार आहे .विविध कामे कार्यालयात न जाता घरी बसून करता येतील .थ्रीडी प्रिटिंग तंत्रज्ञानामुळे ही सिव्हील इंजिनिअर्स , आर्किटेक्ट चे काय होणार असा प्रश्न करुन ते म्हणाले की पुढील २० ते २५ वर्षात तंत्रज्ञान बदलाचा वेग प्रचंड वाढलेला असणार आहे . लोकांच्या रोजगाराचे स्वरुप बदलणार असून जे नवे शिकणार नाही ते बाहेर पडतील हे वेगाने होणार आहे. नवीन नोक-याही तयार होतील .
उद्याचे जग काय आहे , कसे असणार आहे. हे जाणून घ्या .उद्याचे जग काय आहे हे कळले नाही तर आपण उद्याचा जगात तरणार नाही . कृत्रिम बुध्दीमत्तेचा विकासाचे तीन ट्प्प्ये त्यांनी यावेळी सांगितले . माझ्यातील कुतुहल जाग ठेवत नवीन जाणुन घेत असतो. .लोक काय म्हणतात याचा विचार न करता आपले काम करीत राहा असे गोडबोले म्हणाले .शिवजयंती व्याख्यान मालेत बोलताना  लेखक अच्युत गोडबोले
समितीचे अध्यक्ष रविंद्र धनक यांचे यावेळी मनोगत झाले . प्रास्ताविक ॲड . विक्रम पाचंगे यांनी केले . सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय बारवकर यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button