क्राईम

पार्किंग केलेली ॲक्टिव्हा मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरली

रोहिणी सुभाष औटी यांची चोरीस गेलेली ॲक्टिव्हा
रोहिणी सुभाष औटी यांची चोरीस केलेली ॲक्टिव्हा
शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शाळेच्या कपाउंट जवळ हॅडल लॉक करुन पार्किंग केलेली ॲक्टिव्हा मोटारसायकल अज्ञात चोरट्यांने चोरुन नेली आहे .याबाबत रोहीणी सुभाष औटी वय ३८ वर्ष रा. जोशीवाडी शिरूर, ता . शिरूर, जि . पुणे यांनी फिर्याद दिली आहे.

रोहिणी औटी या शिक्षीका असून त्याचे पती सुभाष औटी हे संपदा पतसंस्थेमधे नोकरी करतात.औटी या विदयाधाम प्रशालेमध्ये शिक्षीका म्हणून काम करतात व शाळेला जाणे येणे साठी होंडा कंपनीची ग्रे कलरची ॲक्टीव्हा गाडी नं एम .एच. 12 – के. एम. 2876 ही गाडी वापरतात . 17 फेबृवारी 2025 रोजी नेहमी प्रमाणे शाळेच्या कंपाउडच्या भींती लगत होंडा कंपनीची ॲक्टीव्हा हँडल लॉक करून पार्क केली व ड्यूटी साठी त्या शाळेमधे गेल्या . त्यानंतर दुपारी घरी जाणे साठी शाळे मधुन बाहेर आल्यावर पार्क केलेल्या ठिकाणी गाडी दिसुन आली नाही.
याबाबत अज्ञात चोरटयाविरूध्द फिर्याद देण्यात आली आहे . याबाबतचा तपास
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राऊत करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button