शैक्षणिक

साहित्यीकांच्या सहवासाने आयुष्य समृध्द होवून साहित्यीक म्हणून घडलो

बोरा कॉलेज मधील डॉ . जयकर व्याख्यानमालेत साहित्यीक विलास सातपुते यांचे प्रतिपादन

       शिरुर दिनांक ( वार्ताहर )
साहित्यीकांच्या सहवासामुळे आपले आयुष्य समृध्द झाले व आपल्यातील साहित्यीक घडला असे साहित्यीक विलास सातपुते शिरुर येथे म्हणाले .
बहि :शाल शिक्षण मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व चांदमल ताराचंद बोरा कॉलेज मध्ये डॉ . बाबासाहेब जयकर व्याख्यान मालेत साहित्यीक विलास सातपुते यांचे ‘ मराठी साहित्यीकांचा सहवासात ‘ या विषयांवर व्याख्यान झाले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ . के. सी .मोहिते होते .

opसातपुते म्हणाले की आपणांस साहित्यीक बळवंत देशमुख ,द. ता. भोसले यांच्या सहवास लाभला . शिक्षकांमुळे आपण मोठे होतो. सन १९६३ मध्ये सातारा येथे साहित्य संमेलनात स्वंयसेवक म्हणून काम करता आले . त्यावेळी साहित्यीक प्र . के .अत्रे यांच्या तीन दिवसाचा सहवास लाभला .यावेळी त्यांनी माझे नाव विगसा हे नाव ठेवले. .साहित्यीकांचा सहवासातूनच मी कविता लिहू लागलो . नवोदित साहित्यीकांनी प्रस्थापित साहित्यीकांचा सहवासात राहा त्याच्यातून तुम्ही समृध्द होताल .कवियत्री शांता शेळके यांच्या समवेतच्या आठवणी त्यांनी सांगितले . वि . वा . शिरवाडकर , न. भि .जोशी , डॉ . अशोक कामत , ज्येष्ठ्य समीक्षक द . भि .कुलकर्णी यांच्याही सहवास लाभला . मुद्रक म्हणून १६३० पुस्तके प्रकाशित केले . मनन ,चिंतन , वाचन नवोदित साहित्यीकांनी करावे . ३६ साहित्यीकाच्या सहवासावर आधारित पुस्तक लिहिले आहे .

यावेळी व्याख्यानमालेचे केंद्र कार्यवाह डॉ . बाळकृष्ण लळित यांनी प्रास्ताविक केले .प्राचार्य डॉ . के .सी .मोहिते यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले . याप्रसंगी मराठी विभागाचे प्रा . डॉ . राजाभाउ भैलूमे , हिंदी विभागाचे प्रा . डॉ . ईश्वर पवार , प्रा . डॉ . जोशी आदी  उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . डॉ . क्रांती गोसावी यांनी केले .
आभार प्रा . डॉ . ईश्वर पवार यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button