शिरूर दिनांक ( वार्ताहर )
अनोळखी ३५ ते ४० वर्षे वयाचा पुरूषाचा मृतदेह पाषाणमळा येथील रिलायन्स पंपाजवळील गाळ्या समोर आढळून आला आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी प्रवीण कैलास साळुंखे वय- 29 वर्षे व्यवसाय शेती राहणार स्वामी समर्थ अपार्टमेंट ता. शिरूर जि- पुणे यांनी खबर दिली आहे .
दिनांक 23 फेबृवारी 2025 रोजी साडेसातचा पूर्वी शिरूर पाषाणमळा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाचे जवळ मधुकर शिंदे यांच्या गाळ्याच्या समोर
अनोळखी ३५ ते ४० वर्षे वयाचा पुरूष मयत अवस्थेत आढळून आला याबाबतचा आधिक तपास पोलीस हवालदार खेडकर करीत आहेत .‡