महाराष्ट्र
Check Also
Close
-
शिरूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी रवींद्र भोसले3 days ago
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या शिरूर तालुका शाखेच्या वतीने पंचायत समिती परिसरातील दत्त मंदिर येथे शेतकरी व ग्राहकांसाठी कृषी विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात शिरूर तालुका कृषी अधिकारी कोमल मनोहर हिरडे यांनी विविध शासकीय कृषी योजनांची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांनी उपलब्ध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
उपलब्धतेबाबत, गुणवत्तेबाबत उद्भवणाऱ्या तक्रारी आणि त्यावरील उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते व बियाणे खरेदी करून त्याची पावती जतन करावी, असेही त्यांनी सांगितले.

सौ. प्रतीक्षा निकाळजे, रोहिणी तुकाराम दरेकर, तुकाराम माधवराव फराटे, किरण संतोष गांधी, शिरूर शहर संघटक प्रवीण मुथा यांच्यासह तालुक्यातील ग्राहक पंचायतीचे अनेक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






