महाराष्ट्रविशेष

प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना नीतिमत्ता आणि समाजाभिमुख दृष्टिकोन महत्वाचा : किशोरराजे निंबाळकर

शिरुर दिनांक ( वार्ताहर) प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना नीतिमत्ता, जबाबदारी आणि समाजाभिमुख दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर शिरुर येथे म्हणाले .बाबूराव नगर येथे  राजमाता अभ्यासिकेच्या दुसऱ्या शाखेचे उदघाटन  निंबाळकर यांच्या हस्ते झाले .यावेळी उपविभागीय आधिकारी पाटबंधारे तेजस चिखलीकर , श्री. गणेशा हॉस्पिटलचे डॉ . आखिलेश राजूरकर , डॉ . पाठक , शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे  माजी सभापती ॲड . प्रदीप बारवकर,  चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील  माजी भूगोल विभाग प्रमुख चंद्रकांत धापटे , प्रसिध्द निवेदक रावसाहेब चक्रे , नीलेश काळे ,उद्योजक अशिष शिंदे , बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर चिखलीकर , नारायण बोरुडे आदी उपस्थित होते .

    यावेळी निंबाळकर म्हणाले की  अभ्यासासाठी  एकाग्रता महत्वाची आहे . जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास व सराव करावा  आणि मोबाईलचा योग्य वापर असावा. तालुक्याच्या ठिकाणी राहून यशस्वी होता येते हे सांगून अभ्यासाची पध्दत स्वंत : ने विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले .

प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना नीतिमत्ता, जबाबदारी आणि समाजाभिमुख दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो असे निंबाळकर म्हणाले .

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजमाता अभ्यासिकेचा प्रमुख  प्रा . अलका बेलोटे  ( बोरुडे )यांनी केले .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची भक्कम पायाभरणी व्हावी म्हणून   राजमाता अभ्यासिकेची स्थापना करण्यात आली आहे .स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आता  मोठ्या शहरातील महागड्या क्लासेसचा आधार घ्यावा लागणार नाही. आधुनिक ऑनलाईन सुविधांसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेच्या माध्यमातून करिअर घडविण्याचे स्वप्न साकारण्याचा दृष्टीने ही अभ्यासिका सुरु करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले . शांत, रम्य परिसरात उभारलेली ही शाखा विद्यार्थ्यांसाठी अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास ही बेलोटे ( बोरुडे )यांनी व्यक्त केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा .सतीश धुमाळ यांनी तर स्वागत नारायण  बोरुडे यांनी केले. डॉ.अखिलेश राजुरकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button