शिरुर (डेली न्यूज पोस्ट टीम -24) निरोगी जीवनासाठी नियमित प्राणायम व योगासन आवश्यक असून आपल्या धकाधकीच्या जीवनातून योग व प्राणायामासाठी नियमित वेळ द्यावा असे आवाहन शिरुर तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष राहूल बाबूराव पाचर्णे यांनी केले .
जागतिक योगदिनानिमित्त भारतीय जनता पक्ष शिरुर तालुका व शहर यांचा वतीने तीन दिवसाचे योग प्राणायाम शिबीराचे आयोजन शिरुर नगरपरिषदेचा मंगल कार्यालयात करण्यात आले होते .
व्यवसायिक राजेंद्र उर्फ चंदू शेठ चोपडा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
या प्रसंगी पाचर्णे बोलत होते . आपल्या धावपळीचा जीवनात शारिरीक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य आहार , नियमित प्राणायाम योग व व्यायाम व सकारात्मक विचार आवश्यक आहेत . भाजपाचा वतीने शिरुर शहरात मागील ८ वर्षापासून योगदिनानिमित्त शिबीराचे आयोजन करण्यात येत असून दरवर्षी शिबीरात उपस्थिती वाढत असल्याचे पाचर्णे म्हणाले .
योगशिक्षक शिवाजी कुलाळ यांनी योग व प्राणायमचे मार्गदर्शन केले . मागील 8 वर्षा पासून भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे हे या शिबीराचे आयोजन करतात .१०० हुन आधिक जणांनी या शिबीरात सहभाग घेतला .
भाजपाचे तालुकाध्यक्ष राहूल पाचर्णे , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार , भाजपा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष राजू शेख ,दिलिप हिंगे , माजी शिक्षक अशोक शेळके , विजय नरके ,हुसेन शहा , नीलेश नवले आदी उपस्थित होते.
चांदमल तारचंद बोरा महाविद्यालयात योगदिनानिमित्त योगशिक्षक प्रशांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम करण्यात आली . प्राचार्य डॉ . के . सी . मोहिते व उपप्राचार्य हरिदास जाधव यावेळी उपस्थित होते .
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त शिरूर शहरातील ओन्ली वुमन्स जिम व भाजपा शिरूर शहर महिला आघाडीच्या वतीने योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील साई गार्डन या ठिकाणी सकाळी सहा वाजता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रिया बिरादार यांनी योग काय असतो व तो कसा करावा याबद्दल माहिती दिली . योगी आचार्य गोपेश ब्रह्मपुरीकर यांनी योगाचे सर्व प्रकार घेऊन त्याचे आरोग्यासाठी महत्त्व समजून सांगितले..
यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल पाचर्णे, भाजपा उपजिल्हाध्यक्ष महिला मोर्चा वर्षा काळे, पुणे जिल्हा अल्पसंख्यांक सरचिटणीस राजू शेख ,नगरसेवक विनोद भालेराव, शशिकला काळे आदिशक्ती महिला मंडळच्या शशिकला काळे, आधार छाया फाउंडेशनचा सविता बोरुडे , शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख सुजाता पाटील, भाजपाचे माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे ,विजय नरके, नवनाथ जाधव, नीलमधू शर्मा, दिलीप हिंगे, योगेश जामदार, हुसेन शहा,आकाश चाकणे अजित डोंगरे, शिवसेनेचे सुरेश गाडेकर, प्रमोद जोशी, समीर शेख तसेच प्रीती बनसोडे, विजयालक्ष्मी उपाध्याय ,जयश्री हारदे आदी उपस्थित होते..
डेली न्यूज पोस्ट टीम -२४ चा वतीने माजी नगरसेवक व व्यवसायिक चंद्रकांत बाफना यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ओन्ली वुमन्स जिमच्या संस्थापिका व भाजपाच्या महिला आघाडी अध्यक्षा प्रिया बिरादार यांनी केले व सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी आभार मानले. जिजामाता गार्डन योगा ग्रुपच्या वतीने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला . योगाचार्य नाना पोटे, हरकचंद बरमेचा , ललित नहार ,प्रमोद पवार , भाऊ बेंद्रे, रावसाहेब देशमुख , संपत लोखंडे , सुरेश पडोळे, दत्तात्रय रासकर, आदी यावेळी उपस्थित होते .