Uncategorized

सिताबाई थिटे कॉलेज ऑफ डी.फार्मसीच्या निकालात मुलींची बाजी


शिरुर : (डेली न्यूज पोस्ट टीम-24)
राज्यस्तरीय आदर्श महाविद्यालय पुरस्कार प्राप्त सीताबाई थिटे कॉलेज ऑफ डी. फार्मसी शिरूर हे पुणे जिल्हातील एक नावाजलेले महाविद्यालय असून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या डी. फार्मसी च्या सन २०२५ च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे . थिटे महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल ९६% व द्वितीय वर्षाचा निकाल ७१% लागला .
या परीक्षेत प्रथम वर्ष डी. फार्मसी मध्ये कु. पंचमुख पायल धनंजय ८१.७०%, इचके श्रद्धा चंद्रकांत ८१.६०%, कु.आवटे कृतिका कैलास ८०.६०% व द्वितिय वर्षामध्ये कु.दौंडकर साक्षी संभाजी ८४.५५%, कु.लगड अपर्णा बाबासाहेब ८३.८२%, कु.परमार खुशबू पारस ८१.९१% यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला
. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे डी. फार्मसी चे प्राचार्य डॉ.अमोल शहा यांनी अभिनंदन केले आहे .

व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष विकासजी पोखरणा यांना डेली न्यूज पोस्ट टीम -२४चा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष विकासजी पोखरणा यांना डेली न्यूज पोस्ट टीम -२४चा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button