महाराष्ट्र

मातोश्री प्रतिष्ठानच्या किल्ले बनवा स्पर्धेत युवा संघर्ष गणेश मंडळ मुंबई बाजारचा प्रथम क्रमांक

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) मुलांना इतिहास कळणे गरजेचे असून इतिहासामध्ये गड किल्ल्यांना किती महत्त्व होते हे नवीन पिढीला त्याचे महत्त्व कळण्यासाठी व ते कायमस्वरूपी त्यांना लक्षात राहण्यासाठी किल्ले स्पर्धा भरवणे ही काळाची गरज असल्याचे मत शिरूर नगर परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती अभिजीत पाचर्णे यांनी व्यक्त केले
मातोश्री कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने 2024 यावर्षी किल्ले स्पर्धा आयोजित केली होती .या स्पर्धेचा बक्षीस वितरण माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे व समस्त सकल मराठा समाज संघचे विश्वस्त उद्योजक सागर नरवडे यांच्या हस्ते पार पाडला.
या वेळी मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर, प्रा. सतीश धुमाळ,मुकुंद ढोबळे, शैलेश जाधव, सतीश केदारी, प्रमोद वाघचौरे, साजिद शेख, किरण आप्रे आदीसह बक्षीस मिळवलेले व या स्पर्धेत सहभागी घेतलेले विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सागर नरवडे यांनी सांगितले की मातोश्री प्रतिष्ठान प्रतिष्ठानचा हा उपक्रम कौतुकास्पद असून भविष्यात किल्ले स्पर्धा अजून मोठ्या प्रमाणात भरवण्यासाठी त्यांनी मुलांना प्रोत्साहित करावे.
या किल्ले स्पर्धेत पन्नास हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला असून या स्पर्धेत प्रथम क्रमांक युवा संघर्ष गणेश मंडळ मुंबई बाजार तर

डेली न्युज पोस्ट -24 चा वतीने व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष विकास पोखरणा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
डेली न्युज पोस्ट -24 चा वतीने व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष विकास पोखरणा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

द्वितीय क्रमांक सायेशा आढाव तृतीय क्रमांक काव्या बाफना चतुर्थ क्रमांक सिद्धांत मुथा पाचवा क्रमांक सिद्धार्थ पठारे व सहावा क्रमांक श्रुती डहाळे यांचा आला . स्पर्धेत भाग घेणाऱ्याला एक सन्मानचिन्ह यावेळी देण्यात आले .यावेळी स्वागत शैलेश जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश धुमाळ यांनी केले तर आभार सतीश केदारी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button