Uncategorized

आर. एम.धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूरच्या विद्यार्थ्यांची एन.सी.सी कॅम्प साठी निवड


शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
आर . एम . धारीवाल इंग्लिश मिडियम स्कूल शिरुरच्या २२ विद्यार्थ्यांची एन .सी सी कॅप्म साठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापिका अश्विनी घारु यांनी दिली .
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर शाळेत मागील शैक्षणिक वर्षापासून एन.सी.सी सुरू करण्यात आले.इयत्ता आठवीच्या एकूण २५ विद्यार्थ्यांची यासाठी निवड झाली आहे .
हजरत बिलाल आसिफ अहमद हिरेवल्ली, श्रेयश संदीप साबळे, अभिषेक कमलेश पाल , रितेश शरद फलके, वेदांत नितीन महाजन ,साहिल राजेंद्र जाधव,जगदीश विवेकानंद महाजन,तेजस स्वप्निल यादव, सारंग दिपक जगदाळे, शिवम सुरज गुप्ता,वेदांत कल्याण पवार , जिब्राईल इरफान शेख, मिताली राहुल बोरा ,वेदिका पंढरीनाथ साळवे , पूजा आनंदराव वाळुंज , दिया प्रमोद कलेर , प्रेरणा आप्पासाहेब गोळेकर , गायत्री नितीन घोडके ,अल्मास साबीर तांबोळी,अवनी नरेंद्रसिंग राजपूत, पूर्वा राहुल येवले, अंजली लक्ष्मण कोळी अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत .
दहा दिवसांच्या या कॅम्पमध्ये या सर्व विद्यार्थ्यांना शिस्त, नेतृत्व,सामाजिक जबाबदाऱ्या अशा महत्त्वपूर्ण गोष्टी शिकायला मिळणार आहेत.ड्रिल व साहसी उपक्रम शिकायला मिळणार आहेत.यामुळे या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.
मागील शैक्षणिक वर्षात 25 विद्यार्थी व या शैक्षणिक वर्षात 25 विद्यार्थी अशी 50 विद्यार्थ्यांची तुकडी यावर्षी एन.सी.सी साठी असणार आहे.या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक रवी कुरुंदळे मार्गदर्शन करतात.
प्रथमच कॅम्पला गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे व शाळा समितीचे अध्यक्ष अनिल बोरा , संस्थेचे सचिव नंदकुमार निकम,सदस्य धरमचंद फुलफगर, तसेच प्राचार्या अश्विनी घारू यांनी अभिनंदन केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button