विशेषसामाजिकसांस्कृतिक
ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन सर्वांची जबाबदारी : इतिहास संशोधक प्रा. डॉ . पद्ममाकर प्रभूणे

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
शिरुर परिसराला मोठ्या ऐतिहासिक वारसा असून या वारसाचे जतन व संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे इतिहास अभ्यासक व संशोधक प्रा . डॉ .पद्माकर प्रभुणे म्हणाले .
येथील सनसाईन क्लबचा वतीने ‘ पुरातत्व, इतिहास आणि शिरूर परिसर ‘ या विषयावर प्रभुणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, सांगली येथील पोलीस उपअधीक्षक अनिल कटके , माजी सनदी आधिकारी प्रभाकर गावडे , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रेय वारे , सिंहगड इंजिनिरिंग कॉलेज सोलापूरचे प्राचार्य डॉ . शंकर नवले ,पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य चंदूलाल चोरडिया, आदी उपस्थित होते.

शिरुर परिसरातील
महाजन मळा परिसरात ज्वालामुखीय राख -टेफ्राचे अवशेष आढळतात .त्याच बरोबर इनामगाव येथे ताम्रपाषाण युगातील शेतीचा, पाटबंधाराचा पुरावा, मातीचे भांड्याचे पुरावे आढळून आले आहेत .त्याच बरोबर पाणघोडा व काळविट ही तिथे आढळून आल्याचे पुरावे आहेत .

तळेगाव परिसरात ही यादव कालीन शिलालेख आढळून आला आहे . पाबळ येथील मस्तानीची कबर , छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ याबाबतची माहिती त्यांनी दिली .
रांजणगाव येथे शेतात सापडलेल्या नाण्याचा संचय यातून त्याकाळी त्या परिसरात असणारा व्यापार मार्ग व संपन्नतेची जाणीव करुन देतो .पिंपरी दुमाला येथील यादवकालीन मंदिर व त्याची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितले .गांजी भोयरे येथील जुने मंदिर ,
जुन्नर येथील नाणे घाट ,

टाकळी ढोकेश्वर येथील लेणी मंदिर,याबाबत माहिती देवून छत्रपती शिवाजी महाराज यांची नाणी व विविध राजे व देशाच्या नाण्यांची माहिती देवून त्याकाळात पुणे परिसरातून होत असणारे व्यापार व व्यापाराचे मार्ग यावर भाष्य केले .महमंद तुघलकचा काळातील नाणी ही शिरुर परिसर सापडतात . निजामशाहीच्या काळातील ग्रंथात ही सिरुर नावा चा उल्लेख आढळून येतो. .शिरसगाव काटा परिसरात वीरगळ आढळून आल्याचे ही प्रभुणे यांनी सांगितले .
शिरुर शहर परिसरातील ब्रिटिशांची छावणी, घोरपडे रिसाला व इंग्रज आधिकारी कर्नल वॉलेस याबाबतचा इतिहास सांगितला . त्याकाळी स्थानिक लोक कर्नल वॉलेस यांचा नावाने कंदुरी करत . त्याची समाधी रामलिंग रोड वरील ख्रिश्चन दफनभूमीत आहे .शिरुर परिसरातील विविध गावांच्या उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात आढळून येतो .
शिरुर परिसराला मोठी सैनिकी परंपरा असून विविध लढाया मध्ये परिसरातील लोक सहभागी झाले होते . पहिल्या व दुसरा महायुध्दात ही सहभाग आढळून येतो . शिरुर शहरा शेजारुन जाणा-या बायपास रस्ताचे काम सुरु असताना खापराचे तुकडे आढळून आले .

शिरुरचा हा परिसर ऐतिहासिक दृष्टया महत्वाचा असून इतिहासचा हा वारसा व ठेवा सर्वांनी जाणून घ्यावा त्याच्या अभ्यास करुन संवर्धन करावे असे आवाहन प्रभुणे यांनी केले .
यावेळी प्रास्ताविक किशोरराजे निंबाळकर यांनी केले . याच कार्यक्रमात लंडन स्कूल ऑफ इकानॉमिक्स स्कूलला शिक्षणासाठी निवड झालेल्या शिरुरच्या अनुष्का संतोष पठारे यांच्या व वयाच्या ६३ व्या वर्षी वकिलीची पदवी प्राप्त केलेले बाबूराव पाचंगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला .

