Uncategorized

सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांवर कारवाई करावी या मागणी करीता शिरुर येथे आंदोलन

संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींचा फोटोस जोडो मारो आंदोलन

शिरुर दिनांक ( वार्ताहर )
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी त्याच बरोबर आकावर ही कारवाई करावी अशी मागणी करीत संतोष देशमुख यांच्या मारेकरांच्या फोटोस जोडो मारो आंदोलन शिरुर येथे करण्यात आले .
छत्रपती शिवाजी महाराज की जय , छत्रपती संभाजी महाराज की जय च्या घोषणा बरोबर , सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना शिक्षा झालीच पाहीजे अश्या ही घोषणा देण्यात आल्या .मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अंत्यत निर्घूणपणे व अमानुषपणे करण्यात आली असून या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई याप्रकरणातील संबधित सर्वांवर जलद पणे कारवाई करावी कोणाच्या दबावाला बळी न पडता कारवाईची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली . खून प्रकरणातील आरोपीच्या फोटोना जोडे मारो आंदोलन करण्यात आले .

हॉटेल आस्वाद जवळ हे आंदोलन करण्यात आले .यावेळी आखिल भारतीय मराठा महासंघाचे श्यामकांत वर्पे ,  महिला आघाडी तालुकाध्यक्ष अर्चना डफळ , संघटक आशा ढवण ,  माजी  अध्यक्षा  शशिकला काळे , जनता दलाचे संजय बारवकर , समस्त मराठा समाज संघचे विश्वस्त व माजी उपसरपंच संभाजीराव कर्डिले, रामभाउ इंगळे , संजय माशेरे , महेंद्र ढेरे ,  अखिल भारतीय मराठा महासंघ युवा आघाडीचे राहुल शिंदे , शिरुर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष आप्पा वर्पे , मुकेश पाचर्णे  , भरत ढाके ,आदी यावेळी उपस्थित होते

प्रसिध्द व्यवसायिक महेश नीळकंठ देशमुख ( मलठणकर ) यांना डेली न्यूज पोस्ट -२४ च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button