शैक्षणिक
सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी रिया अग्रहरी यांचा स्टेट लेवल पेपर प्रेझेंटेशन मध्ये पहिला क्रमांक
सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे, डॉ. हर्षवर्धन थिटे, प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती यांनी केले अभिनंदन
शिरुर दि . ( वार्ताहर )सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थिनी रिया शिवसेवक अग्रहरी यांनी स्टेट लेवल पेपर प्रेझेंटेशन मध्ये यश मिळवित प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे .
जय हिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी येथे इंडियन फार्मासुटिकल असोसिएशन व जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्टेट लेवल पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन या विभागात तृतीय वर्ष बी ,फार्मसीची विद्यार्थीनी कु. रिया शिवसेवक अग्रहरी हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे . आळेफाटा लोकल ब्रॅंच यांच्या वतीने या विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला.
सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे, डॉ. हर्षवर्धन थिटे, प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी रिया अग्रहरीचे अभिनंदन केले आहे .
