महाराष्ट्रविशेष

श्रीराम सेना शिरुरच्या सन -२०२५ च्या तिथी नुसार शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अविनाश वसंत जाधव

बैठकीत सर्वानुमते निवड

शिरुर : श्रीराम सेना शिरुर शिवजयंती उत्सव समिती सन -२०२५ च्या अध्यक्षपदी अविनाश वसंत जाधव यांची निवड करण्यात आली आहे
तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरी  करणे व श्रीराम सेनेच्या सन -२०२५ ची कार्यकारिणी जाहीर करण्या संबधी नगरपरिषद मंगल  कार्यालयात बैठक झाली . या बैठकीत अविनाश जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली .
यावेळी बैठकीत  श्रीराम सेनेचे संस्थापक सुनील जाधव , माजी नगरसेवक मंगेश खांडरे , सतिश व्यवहारे व उमेश शेळके , योगेश महाजन आदीनी मार्गदर्शन केले .
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ्य शिवसैनिक खुशाल गाडे होते . यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार , शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे , तुकाराम खोले, माजी नगरसेवक संदिप गायकवाड , किरण बनकर ,आदी उपस्थित होते .
निवडीनंतर सर्वाना बरोबर घेवून तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येईल असे अविनाश जाधव यांनी सांगितले .
जाधव हे हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष असून समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीचे विश्वस्त ही आहेत .

निवडी नंतर जाधव यांचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर रणजीत गायकवाड , अशोक काळे , श्याम परदेशी , राकेश परदेशी , सिंकदर मण्यार ,
सपंत दसगुडे , सागर नरवडे , सुनील जठार , प्रसाद लांडे , स्वप्ननील चौधरी , राजेराम घोडके  आदीनी  जाधव यांचे अभिनंदन केले आहे . बैठकीचे सूत्रसंचालन शाहीर जालिंदर कुंरदळे यांनी केले तर आभार स्वप्नील रेड्डी यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button