क्राईम

शेतातील उसाची चोरी व जमिनीची नांगरट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
शेतात बेकायदेशीरपणे शिरुन एक एकरातील ऊस चोरी करून नांगरट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती शिवाजी जाधव वय ४२ वर्षे व्यवसाय शेती मुळ रा. निमोणे ता. शिरूर जि. पुणे सध्या राहणार – विश्रांतवाडी पुणे यांनी १) महादेव भगवान लाड २) आरूणा नाना काळे ३) नाना सोनबा काळे सर्व रा. निमोणे त. शिरूर जि. पुणे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे .
१९ मे २०२५ रोजी ज्योती जाधव यांनी निमोणे ता. शिरूर जि. पुणे येथे येवुन त्यांनी खरेदी केलेली जमीन गट नं 1064/1/अ मधील एक एकर क्षेत्रात जावून पाहिले असता त्याच्या क्षेत्रामधील लावलेला एक एकर ऊस तोडुन चोरी करून घेवुन गेल्याचे व सदर जमीनीमध्ये नांगरट केलेली दिसुन आली. शेजारील शेतकरी महादेव भगवान लाड यांचे चालु असलेल्या शेताच्या वादावरून जाधव यांनी खरेदी केलेल्या शेत जमिनीचे मुळ मालक आरूणा नामा काळे व नाना सोनबा काळे यांनी महादेव भगवान लाड यांना जाधव यांच्या मालकीचे क्षेत्रातील ऊसाचे पीक चोरी करून घेवुन जाण्यास व सदर क्षेत्रातील नांगर करण्यास मदत केली म्हणून महादेव भगवान लाड ,आरुणा नाना काळे , नाना सोनबा काळे सर्व रा. निमोणे ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरोधात जाधव यांनी तक्रार दिली आहे . या प्रकरणी आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार टेंगले करीत आहेत .

बांधकाम व्यवसायिक राजेंद्र देशमुख यांना डेली न्यूज पोस्ट टीम -२४ चा वतीने भावपुर्ण श्रध्दांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button