Uncategorized

माजी नायब तहसिलदार श्रीधर तांबे यांचे निधन

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

 

 

श्रीधर तांबे सेवानिवृत्त नायब तहसिलदार
शिरुर  दि. (वार्ताहर) :
 सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्रीधर दशरथ तांबे   वय ६९ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 
त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले,  तीन  विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतीशील शेतकरी महेश तांबे व   आयपीएस अधिकारी  पी. एम. आर .डी .ए चे पोलीस अधीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी अमोल तांबे यांचे ते वडील होत, तर पुण्याच्या उपजिल्हाधिकारी अर्चना अमोल तांबे यांचे ते सासरे होत.
     श्रीधर तांबे यांनी खेड, जुन्नर, आंबेगाव, दौंड, शिरूर या तालुक्यात तलाठी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर सर्कल इन्स्पेक्टर, सर्कल ऑफिसर म्हणून ते कार्यरत होते. 2014 साली भोर तालुक्यात असताना ते नायब तहसीलदार पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या मूळ गावी गणेगाव खालसा ( ता. शिरूर) येथे  शेतीत वेगवेगळे प्रयोग करत, आधुनिक पद्धतीने शेती करून एक प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला होता . कोरोना काळात गावात कोविड सेंटर उभारण्यापासून, शाळांना मदत करत सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
          

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button