विशेष

शिरुर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा टिकवून ठेवला

संस्थेचा ८० व्या वर्धापनदिन कार्यक्रमात महाविद्यालयीन नियामक मंडळाचे अध्यक्ष व प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारिवाल यांचे प्रतिपादन

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट 24 टीम )शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगतीत विद्यार्थी , शिक्षक त्याच बरोबर माजी विद्यार्थी , माजी शिक्षक  , संस्थेचे माजी विश्वस्त व विद्यमान विश्वस्त या सर्वांचे योगदान महत्वाचे असून संस्थेने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा  दर्जा टिकवून ठेवला  असल्याचे  प्रतिपादन चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे नियामक मंडळाचे अध्यक्ष व प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी केले .

उद्योजक प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल                        शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त विद्याधाम प्रशालेचा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा , महाविद्यालयीन नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल , शिरुर शिक्षण मंडळाचे चंदुलाल चोरडिया ,  मोहनलाल गादिया ,प्रकाश बोरा , शिरीष बरमेचा ,धरमचंद फुलफगर , शिरीष गादिया , राजेंद्र भटेवरा , राजेंद्र दुगड , कुमारपालजी बोरा , प्रकाश बाफना व संस्थेचे सचिव नंदकुमार निकम  , प्राचार्य डॉ .के . सी . मोहिते ,प्रशासकिय आधिकारी देशपांडे  आदी यावेळी उपस्थित होते .

यावेळी धारीवाल म्हणाले की संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त ११ शाखेतील विद्यार्थी व शिक्षकांनी मिळवलेले यश , विविध स्पर्धा , क्रीडा स्पर्धा यासह विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाचा मागोवा घेवून या शाळांना व शिक्षकांना सन्मानित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे . सन १९४६ साली संस्थेचा लावलेला रोपाचा आज वटवृक्ष झाला आहे . बोरा कॉलेजचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम नंदकुमार निकम यांनी केले .असे ही धारीवाल म्हणाले .शिक्षक व विद्यार्थी हे दोघे ही महत्वाचे असल्याचे ही ते म्हणाले .

 

शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा म्हणाले की शिक्षणात गुणवत्ता महत्वाची आहे .आगामी काळात आमूलाग्र बदल होणार असून या बदलास सामोरे जाण्यासाठी शिक्षण महत्वाचे ठरणार आहे .
     नंदकुमार निकम यावेळी म्हणाले की
शिरुर तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणुन शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली . ६ फेबृवारी १९४६ या संस्थेची स्थापना झाली . १९४६ ला ७५ विद्यार्थी संख्या व ४ शिक्षक होते . आज संस्थेचा ११ शाखातून २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून ६९२ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहे.सन १९६७ ला संस्थेने महाविद्यालय सुरु केले . शिक्षण हे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून द्यावे लागते व शिक्षकांना लवचिक राहावे लागते . कॉलेज मधील शिक्षकांकडून संशोधनाची अपेक्षा असते. बोरा महाविद्यालयातील दोन शिक्षकांना पेंटट मिळाले आहे . प्रा. .अशोक चौधरी या शिक्षकाने नवीन वनस्पतीचा शोध लावला आहे . क्रिडा क्षेत्रात ही संस्थेतील विद्यार्थ्यानी मोठे यश मिळविले आहे .कृत्रिम बुध्दीमत्ते मुळे सर्वच क्षेत्रात मोठे बदल होत आहे . कृत्रिम बुध्दीमत्तेचा वावर वाढत असला तरी शिक्षकांना महत्व असणार आहे . आगामी काळात शिक्षकांना आमृलाग बदल करावे लागणार असून नवीन तंत्रज्ञान स्वीकारुन नवीन बदल स्वीकारावे लागणार आहेत . संस्थेने दैंनदिन कामकाजात ई प्रशासन सुरु केले आहे .
नवीन शैक्षणिक धोरणात  शिक्षकांना  स्वंत: ला सामावून घेता आले पाहीजे . शिरुर शिक्षण प्रसारक मंडळ नेहमीच विविध क्षेत्रात अग्रगण्य राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

प्रकाश बाफना यावेळी म्हणाले की पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची असते व शिरुर शिक्षण प्रसारक मंडळात उत्कृष्ट शिक्षकांची फळी आहे .या प्रसंगी विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या गुणवंत शिक्षक व मुख्यध्यापकांचा, शाळांचा सन्मान करण्यात आला .यात प्राचार्य डॉ . के . सी . मोहिते , मुख्याध्यापक राजेंद्र थोरात , मुख्याध्यापक रामदास चव्हाण ,मुख्याध्यापिका ज्योती मुळे व मुख्याध्यापक डोके याचा समावेश होता .प्रास्ताविक मुख्याध्यापिका ज्योती मुळे यांनी केले . तर सूत्रसंचालन डॉ . क्रांती पैठणकर व दीपक गुजर यांनी केले . आभार डी . एस नाईक यांनी मानले .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button