Uncategorizedराष्ट्रीयविशेष

शिरूरच्या डॉ. दीपिका साकोरे (पाटील) यांची जिल्हा आरोग्य अधिकारी(DHO) गट अ पदी निवड


  • शिरूर दिनांक ( वार्ताहर )
    येथील छत्रपती कॉलनीतील डॉ. दीपिका साकोरे (पाटील) यांची जिल्हा आरोग्य अधिकारी गट अ पदी(DHO) निवड झाली आहे. एमपीएससी ने घेतलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी गट-अ परीक्षा उत्तीर्ण होत साकोरे यांनी यश मिळविले आहे. सध्या त्या नागपूर येथे आरोग्य सह संचालक म्हणून कार्यरत आहेत.

शहरातील छत्रपती कॉलनीत नानाभाऊ साकोरे यांचे कुटुंब वास्तव्य असून त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. डॉक्टर दीपिका ह्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते अर्जुनराव शेटे दादा यांच्या नात होत.
साकोरे यांच्या जेष्ठ कन्या या डॉ. दीपिका या आरोग्य सहसंचालक म्हणून नागपूर येथे कार्यरत होत्या. तर त्यांचे पती कृष्णात पाटील हे रेल्वेत (आयआरएस) वरिष्ठ अधिकारी आहेत. साकोरे यांचा मुलगा डॉ. जय साकोरे हा एम.एस.अर्थो आहे.
डॉ. दीपिका यांच्या भगिनी डॉ. मानसी साकोरे यांनी तीन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सध्या आयपीएस अधिकारी म्हणून त्या हैदराबाद येथे ट्रेनिंग घेत आहेत.
दीपिका यांचे वडील नानाभाऊ हे सैन्य दलातून वरिष्ठ अभियांत्रिकी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत तर आई रंजना या गृहिणी आहेत. नानाभाऊ यांना डॉक्टर बनण्याची तीव्र इच्छा होती.परंतु परिस्थिती अभावी त्यांना डॉक्टर होताआले नाही. परंतु तिन्ही मुलांनी डॉक्टर होत नानाभाऊ यांचे स्वप्न साकार केले.
सैन्य दलातील नोकरीमुळे घरापासून दूर असताना मुलांना घडवण्याचे काम व त्यांचा अभ्यास व त्यांना सुसंस्कृत संस्कारित करण्याचं काम पत्नी रंजना यांनी केल्याचं नानाभाऊ साकोरे यांनी नम्रपणे सांगितलं.
डॉ.दीपिका यांचे प्राथमिक शिक्षण शिरूर नगर परिषदेच्या मराठी शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला या ठिकाणाहून पूर्ण झाले.इयत्ता बारावीला असताना गणित व जीवशास्त्र या दोन्ही विषयात डॉ. दीपिका यांना शंभर पैकी शंभर मार्क मिळाले होते. त्यांनी एमबीबीएस व एम डी चे शिक्षण पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेज मधून पूर्ण केले. सध्या त्या नागपूर येथे आरोग्य सह संचालक म्हणून कार्यरत आहेत.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. दीपिका यांनी सांगितले की ग्रामीण भागातले मुले मुली स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात.प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटी महत्त्वाची आहे. नोकरीच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब जनतेची सेवा करायची असून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांच्या या निवडीबद्दल विविध विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
यशाचा साकोरे पॅटर्न
नानाभाऊ साकोरे यांचे तीन्ही मुले उच्चशिक्षित असुन या सर्वांचे शिक्षण शिरूर नगर परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेतून झाले. साकोरे यांच्या दोन्ही मुली प्रशासकीय सेवेत आहेत. डॉ.मानसी साकोरे ने तीन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तर डॉ. दीपिका या जिल्हा वैद्यकीय अधिकारी (DHO )झाल्या आहेत. मुलगा डॉक्टर जय साकोरे हा एम. एस. आर्थो आहे. विशेष म्हणजे शिरूर नगरपरिषद शाळेच्या मराठी माध्यमातून शिक्षण  पूर्ण करून जिद्द,चिकाटी, मेहनत या जोरावर साकोरे कुटुंबाने यशाचा इतिहास लिहीत नवीन पॅटर्न तयार केला आहे

खेळाडू व शिक्षिका अनिता भोगावडे यांना डेली न्यूज पोस्ट -२४ चा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
शिरुर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्वाती प्रकाश थोरात यांचे डेली न्यूज पोस्ट -२४ चा वतीने हार्दिक अभिनंद्न
खेळाडू व शिक्षिका अनिता भोगावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button