क्राईम

शिरूर येथे युवकांचा डोक्यात दगड घालून खून

oplus_131074
oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}पुणे नगर बायपास रस्त्यावरील बाफना मळा लगत संतोष मारूती ढोबळे वय -२१,मूळ राहणार – आसोला ढोपळा, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली, सध्या राहणार – रा.वाडा कॉलनी, शिरूर या युवकांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार घडला आहे.

  • याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ ऑक्टो रोजी शिरूर शहरा बाहेरून जाणा-या पुणे अहिल्यानगर बायपास रस्त्यावर बाफना मळा लगत संतोष मारुती ढोबळे, वय 21 वर्षे याचा अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर दगड घालून खून केला.

    ढोबळे यांच्या टेम्पोचा व्यवसाय आहे.सदर खुनाच्या गुन्ह्यामधील मुख्य संशयित इसमाचा शोध सुरू असून, त्याचा मागोवा घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आलेले आहे.

    ढोबळे कुटुंब मूळचे आसोला ढोपळा, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली येथील असून, कामाच्या निमित्ताने मागील 15 वर्षांपासून शिरूर येथे स्थायिक आहेत.

    सदर घटनेसंदर्भात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी भेट देऊन पाहणी केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button