Uncategorizedमहाराष्ट्रशैक्षणिक

वसेवाडी ( सणसवाडी ) शाळेचा एन .एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत डंका

शिरुर दिनांक ( वार्ताहर ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या माध्यमातून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा सन २०२५-२६ या वर्षासाठी इयत्ता आठवीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी (सणसवाडी) या शाळेने यशाची परंपरा कायम राखत शंभर टक्के निकाल लावून  घवघवीत यश संपादन केले आहे.  या परीक्षेचा नूकताच जाहीर झाला असून यामध्ये वसेवाडी शाळेतील ३८ विद्यार्थी एन. एम. एम .एस. परीक्षा शिष्यवृत्ती साठी पात्र तर दोन विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती साठी राज्य गुणवत्ता यादीमध्ये पात्र झाली आहेत
. पात्र विद्यार्थी ईश्वरी अमोल दरेकर,संजना युवराज हरगुडे,खंडारे मधुरा,तिडके रागिनी, काळे समर्थ,पटणे समर्थ चव्हाण समृद्धी,मातोळे समृद्धी,शिंदे गंधर्व,लोणे संस्कृती,भगत संघर्ष,परळकर तनुश्री,सय्यद झरीन,मोरे हरी,राव वर्षा,केंद्रे गायत्री,कांगणे गौरी,कदम पायल,घारे आदिती,पलवे वेदांती,अक्षय दीपक,बारापत्रे धनश्री,मेटे शंतूने,सोनटक्के धाराजी,प्रसाद श्रवण,डांगे शुभनी, कोंडाळ विद्या,पाटील हिमांशी,तळके रितेश,मनोहर स्नेहल,इंगोले अनिकेत,गुंड पोर्णिमा,जाधव रोशन, बरसाळे प्रतीक्षा सोपान,गच्चे प्रिया,गाडेकर सृष्टी, गंधर्व शिंदे,नायकल पूर्वा,सोनार स्वास्तिका,इरम मनसुरी
या परीक्षेसाठी मुख्याध्यापक संतोष गोसावी,मार्गदर्शक शिक्षक महिराज इनामदार आणि दिक्षा गुंदेचा यांनी  विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.  सरपंच रुपाली दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर समिती अध्यक्ष अमोल हरगुडे,पालक संघांचे उपाध्यक्ष रामदास हरगुडे, सदस्य महेंद्र दरेकर, ग्रामपंचायत सदस्य डॉ.मोहन हरगुडे यांच्या सह मान्यवरांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे  अभिनंदन केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button