५ एप्रिल २०२५ रोजी शिरुर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक सुभाष केवळचंद शिंगवी यांच्या निधनाला वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या जीवनकार्याचा आढावा

काही व्यक्ती आपल्या कार्याशी इतक्या एकरुप होतात की या संस्थेचे नाव घेतले की या व्यक्तिच्या कार्याचे स्मरण होते व त्या व्यक्तींचे नाव डोळ्यासमोर येते . असेच शिरुर नगर परिषद म्हटल की नाव येते ते म्हणजे सुभाष उर्फ हुकुमचंद शिंगवी यांचे . शिरुर नगरपरिषदचे कार्यालयीन अधीक्षक सुभाष शिंगवी यांना पालिकेच्या विविध कायदांची बारीकसारीक माहिती व विविध विषयांचे सखोल ज्ञान यामुळे ते नगरपालिका माहिती व कायदाचा चालता बोलता माहिती कोष होते .
शिरुर नगरपरिषदेतील सेवेत आपले काम भले व आपण भले या विचाराने त्यांनी काम केले . पालिकेचे मुख्याधिकारी असो वा लिपिक की आधिकारी वा स्वच्छता कर्मचारी या सर्वांशी शिंगवी रावसाहेबांचे सलोख्याचे व स्नेहाचे संबंध राहिले. वौयक्तिक जीवनात अनेक संकटे व ताणतणाव अडचणी असल्या तरी पालिकेचे काम करताना याचा परिणाम कामावर त्यांनी कधीच होवू दिला नाही. हसतमुखाने ते सर्वांची कामे मार्गी लावत .
काम करण्याची त्यांची स्वंत:ची एक शैली होती . जणू तो कामाचा शिंगवी पॅटर्नच . नगरपालिकेचे इतिवृत्त कसे लिहावे , ठराव असोत अथवा कार्यालयीन पत्रव्यवहार त्यात वापरायचे शब्द , त्याच बरोबर पुणे कार्यालय असो अथवा मुंबई येथील मंत्रालयातून कामे मार्गी लावण्याचे कसब , त्यासाठीचा पाठपुरावा, यात शिंगवी साहेबाचे कौशल्य वाखण्याजोगे होते .
आपल्या समवेतच्या आधिकारी, कर्मचारी यांच्या कडून निश्चित वेळेत कामे करुन घेण्यात ही त्यांच्या हातखंडा होता . लोकांसाठी आपली सेवा आहे याची जाणिव त्यांनी सतत ठेवली .
शिरुर नगर परिषदेमध्ये काम करत असताना अनेक दिग्गज नेत्यांचा सहवास त्यांना लाभला. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो प्रसिद्ध उद्योगपती रसिकलालजी धारिवाल त्याचबरोबर शहिदखानजी पठाण साहेब प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशजी धारिवाल , याखेरीज माजी नगराध्यक्ष गुलाबजी धाडीवाल , नसिमभाई खान ,विश्वास भोसले ,राजेंद्र क्षीरसागर अशोक कुलथे ते थेट उज्वलाताई बरमेचा . अलकाताई सरोदे , सुवर्णा लोळगे , सुवर्णा दिवटे , मनीषाताई गावडे , रवींद्र ढोबळे यासर्वांबरोबर शिंगवी यांनी काम केले . आपणांस जे जे ठावे ,ते इतरांना सांगून करावे शहाणे या उक्ती प्रमाणे शिंगवी रावसाहेबांनी सर्वांना अमूल्य अशी माहिती, सल्ला व मार्गदर्शन दिले .
शिंगवी रावसाहेब असे निर्गवी ,सात्विक आणि सतत अभ्यास करीत आपले ज्ञान अपटेड ठेवत तसेच इतरांचे ही ज्ञान अपटेड राहण्यासाठी प्रयत्न करीत .
नवे शिकण्याचे ,नवे जाणून घेण्याचे नवीन बदल स्वीकारण्याचे ते बदल आत्मसात करीत स्वंत :ला ते घडवत गेले . कार्यालयीन कामकाजात संगणकाचा वापर सुरु झाल्या नंतर त्यांनी संगणक शिकून त्यात ही ते एक्सपर्ट बनले . शिंगवी रावसाहेब यांना कामाचा नवे शिकण्याचा कधीच कंटाळा येत नसायचा . दहाच्या ठोक्याला ऑफीस मध्ये ते हजर असायचेच .
त्यांची कामाशी असणारी बांधिलकी ही वाखण्याणाजोगी होती .
पालिकेत काम करत असताना नागरी समस्या तक्रारी घेवून आलेल्या लोकांशी प्रेमाने संवाद साधून त्यांच्या तक्रारी कमीत कमी वेळेत मार्गी कश्या लागतील याकडे त्यांच्या कटाक्ष असायचा .
शिंगवी कुटुंबाच्या इतिहासाचा धांडोळा घेतला असता शिंगवी कुटुंब हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील . सुभाष शिंगवी यांच्या जन्म ५ संप्टेंबर १९५३ रोजी मामाच्या गावी म्हणजे पिंपळवंडी तालुका जुन्नर येथे झाला.
लहानपणी अत्यंत प्रेमात व लाडा मध्ये त्यांचे बालपण गेले . वडीलोपार्जित शेतीचे क्षेत्र फार मोठे होते . परंतु कुळ कायद्याचा मुळे मोठ्या प्रमाणावरची स्वमालकीची शेतजमीन शासन जमा झाली .
नियतीचा फेरा फिरला आणि घरची संपन्नता दिवसागणिक कमी होवू लागली . जमिन गेली , त्याच बरोबर विश्वासाने इतरांना दिलेले पैसे , विश्वासाने केलेले व्यवहार याबाबत ही आर्थिक फसगत व फसवणुकीमुळे सामोरे जावे लागले . आणि संपन्न असणारे शिंगवी कुटुंब आर्थिक विवंचनेने घेरले गेले . जवळच्या लोकांनी दिलेल्या अश्या वागणूकीने शिंगवी परीवारास आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले .
परिवाराचे उत्पन्न कमी झाल्याने लहान वयातच मोठी जबाबदारी सुभाष शिंगवी यांच्या खांद्यावर आली . आपल्या कुटुंबास पुन्हा गतवैभव प्राप्त करुन द्यायचे असेल आणि विस्कटलेली आर्थिक घडी सुरळित करायची असेल तर आपणांस शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही हे सुभाष शिंगवी यांच्या लक्षात आले व त्यांनी शिक्षणासाठी आपल्या मामाचे गाव पिंपळवडी गाठले व तिथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले .
उच्च शिक्षणासाठी विद्येचे माहेर घर असणा-या पुणे शहरात गेले व तेथून आपले पदवीचे शिक्षण चांगल्या गुणांनी ते उत्तीर्ण झाले .
दरम्यान शिंगवी परीवार उदरनिर्वाहासाठी शिरूर( घोडनदी ) येथे स्थळांतरित झाला .
कुटुंबाची जबाबदारी अंगावर असल्याने कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी सुभाष शिंगवी यांनी पडेल ती कामे विविध खाजगी दुकानांमध्ये केली
व कुटुंबास हातभार लावला . त्याकाळी टायपिंग शिकण्यास मोठे महत्व होते व टायपिंग येणारास नोकरीची मोठी संधी प्राप्त व्हायची .
साहजिकच सुभाष शिंगवी यांनी टायपिंगची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली .
या टायपिंग परीक्षेने त्यांच्या जीवनास मोठी कलाटणी मिळाली .
टायपिंग येत असल्याने त्यांची शिरुर नगरपरिषदेत नोकरीची संधी मिळाली. वाचनाची व नवीन शिकण्याची प्रचंड आवड , आज्ञाधारकपणा , प्रामाणिकपणा , चिकाटी ,जिद्द आपल्या कामाप्रती आवड व बांधिलकी यामुळे टायपिस्ट , नाके कारकून म्हणून झालेली त्यांची कामाची सुरुवात त्यांना कार्यालयीन अधीक्षक पदापर्यंत घेऊन गेली.
एक प्रामाणिक व मेहनती युवक आपल्या मेहनत प्रामाणिकपणाचा जीवावर कर्तृत्वाची उंच भरारी कशी घेवू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिंगवी रावसाहेब .
आपल्या शासकिय कामात उत्त्तम काम करीत असताना. आपल्या प्रापांचिक व कौटुंबिक जबाबदा-या ही त्यांनी समर्थपणे पार पाडल्या . आपले बंधू महेंद्र व आपल्या बहिणी यांचे शिक्षण , लग्ने ही सर्व कर्तव्ये पार पाडत मोठ्या भावाची जबाबदारी त्यांनी पार पाडली .शिंगवी यांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण म्हणजे राष्ट्रीय जनगणनेच्या कामाच्या योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा .
एका प्रामाणिक आधिका-यांचा शिंगवी रावसाहेब यांच्या रुपाने झालेल्या सन्मान हा सर्वाच्या स्मरणात राहणारा आहे .
कामातील सातत्य , विविध जबादा-या लीलया पार पाडण्याची वृत्ती , स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगरपालिका कामकाज व कायदाची सखोल माहिती ,शिक्षण यामुळे त्यांना चीफ ऑफिसर पदाची पदोन्नती मिळाली. पदोन्नतीनंतर वारंवार होणा-या बदल्या यामुळे त्यांनी पदोन्नती नाकरत शिरुर नगरपरिषदेत ते थांबले .
पिंपरी चिंचवडच्या मोहन शेठ लुनावात यांच्या कन्या शोभा यांच्याशी लग्नाची गाठ जुळली. नगरपालिकेत काम करत असताना त्यांना विविध अनुभवी अधिकाऱ्यांसमोर समवेत काम करता आले प्रशासनावर पकड असणारे किसनदास बरमेचा , रसिकलालजी धारीवाल ,शहिदखान पठाण , प्रकाश धारीवाल यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांसोबत काम करत असताना त्यांच्या गुणांना वाव मिळत गेला.
शिरुर शहरासाठी महत्वाची असणारी
अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी असलेली ३७१ घरांची हुडको गृह योजना ,भुयारी गटार योजना , स्वच्छता अभियान , घोडनदीवरील हत्ती डोह येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा या योजनाचा पाठपुरावा करणे व त्या मार्गी लावण्यात शिंगवी रावसाहेब सातत्याने प्रयत्नशील असायचे .
सन २०११ मध्ये नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले . त्याच्या सेवानिवृत्ती निमित्त सहकारी कर्मचारी , आधिकारी व नागरिक यांनी त्यांच्या नागरी सत्कार करुन सन्मान केला .
सेवानिवृत्त झाले तरी इतरांना मदत करण्याचा सेवा करण्याचा , सामाजिक बांधिलकी मानून सर्वसामान्य जनतेची कामे करण्याचा कामातून मात्र ते कधीच निवृत्त झाले नाही .
लोकांचे काम करण्यात सेवा करण्यात आपणांस आनंद मिळतो असे म्हणत ते लोकांसाठी काम करीतच राहिले .
सेवानिवृत्ती नंतर काही वर्ष त्यांनी लोणीकंद येथील जैन धर्मियांच्या धार्मिक व सामाजिक संस्थेत काम केले . त्या दरम्यान जैन धर्मगुरू महाराज साहब यांच्या सहवास त्यांना लाभला .
सेवानिवृत्त नंतर समाजाची सेवा करीत असताना आपले चिरंजीव राहूल , राजेश , चेतन यांच्या व्यवसायासाही मार्गदर्शन करत या सर्वांचे करियर त्यांनी घडविले .
पालिकेतील कामकाजाच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा नवोदित नगरसेवक कर्मचारी यांना त्यांनी सातत्याने दिला .
वाचनाच्या आवडी बरोबर त्यांना सायकलिंगची आवड होती व ६० वर्ष त्यांनी आपली सायकलिंगची आवड जोपासली .
वडिल केवळचंद शिंगवी व मातोश्री चांदाबाई यांनी दिलेली स्वाभिमानाची शिकवणूक ,कोणत्याही कामाला लाजू नये , थोरा मोठ्यांची आज्ञा पालन करावे , इतरांची सेवा करणे , सामाजिक बांधिलकी , स्वालंबन असे केलेले संस्कार यामुळे सुभाष शिंगवी यांनी आपल्या जीवनातील विविध संकटे व अडचणीवर मात करत आपल्या यशाची यशोगाथा त्यांनी लिहिली .
कष्टमय जीवन व सातत्याने काम करणारे सुभाष शिंगवी यांच्या आयुष्यात सुखाची हिरवळ येण्यास सुरुवात झाली होती . तीन्ही मुले व्यवसायात सेंटल झाले होते . घराचे गोकूळ झाले होते .नातवंडात ते रमून गेले होते . बरेच पुस्तके वाचायची होती . जगभर पर्यटन करायच होत व आधिक प्रमाणात समाजाची , धर्माची सेवा करायची असतानाच ५ एप्रिल २०२४ रोजी हार्ट ॲटकने शिंगवी रावसाहेब यांची प्राणज्योत मालवली .
लोकाप्रति , समाजाप्रति संवेदनशीलता असणारा शिरुर नगरपरिषदेच्या चालता बोलता माहिती कोष शिंगवी यांच्या जाण्याने लोपला .शिरुर शहर व नगरपालिकेच्या इतिहासात त्याच्या कार्याची नोंद नक्कीच होईल .
सुभाष केवळचंद शिंगवी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन