चारचाकी गाडीत झोपलेल्या महिलेस चाकूचा धाक दाखवत सव्वा तोळे सोन्याचा दागिन्यांची चोरी
शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम )
चाकूचा धाक दाखवत महिलेकडील
सव्वा तोळे सोन्याचे ९१ हजार रु . किमंतीचे दागिने चोरट्यानी चोरुन नेले आहेत .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुलोचना दुधाराम राठोड वय ४० वर्षे व्यवसाय मजुरी रा. उत्तरवाडोना, ता. नेर जि. यवतमाळ यांनी दोन अनोळखी इसमा विरोधात तक्रार दिली आहे .
३ एप्रिल २०२५ रोजी पहाटे साडेचारचा सुमारास पुणे अहिल्यानगर रस्त्यावर शिरुर जवळील बो-हाडे मळा येथील कल्याणी हॉटेल समोर अहिल्यानगर पुणे रोडचे पुणे बाजूला सुलोचना राठौड यांचा चुलत भाऊ यास झोप लागल्यान त्यांनी त्यांची चार चाकी गाडी क्र . एम. एच. ३७ ए .डी .८९०७ थांबवून गाडी मध्ये झोपलेले असताना दोन अनोळखी इसमांनी आवाज देऊन गाडीचा दरवाजा उघडण्यास सांगितला व त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवून राठोड यांच्या गळ्यामधील सोन्याचे मणी मंगळसूत्र व कंठण जबरदस्तीने हिसकावून घेतले व भीतीने राठौड यांनी कानातील रिंगाही काढून दिल्या.
.यासंदर्भात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर नकाते तपास करीत आहे .