Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24}: शिरूर–वाघोली दरम्यान सकाळी साडे सहा ते सातच्या दरम्यान व सायंकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान थेट पीएमपीएमएल बससेवा सुरू करून संबंधित बस शिरूर येथे मुक्कामी ठेवावी, अशी मागणी माजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी पीएमपीएमएलचे महाव्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
. शिरूर परिसरातील विद्यार्थी, कर्मचारी, कामगार आणि व्यावसायिक दररोज पुणे व वाघोलीकडे प्रवास करतात. मात्र, सकाळी साडे सहा ते सातच्या दरम्यान व सायंकाळी नऊ ते साडेनऊ च्या दरम्यान थेट बससेवेचा अभाव असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.



