महिला दिना निमित्त कर्तृत्ववान महिलांच्या मातोश्री प्रतिष्ठानचा वतीने विशेष सन्मान
प्रा . अलका बेलोटे , डॉ . स्मिता बोरा , कामिनी बाफना , उद्योजिका माजी सरपंच वर्षा काळे , उद्योजिका स्नेहल झांबरे यांचा विशेष सन्मान
शिरुर दिनांक ( वार्ताहर)
जागतिक महिला दिना निमित्त मातोश्री कला क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वती ने शिरुर शहरातील विविध क्षेत्रातील महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला .
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर , आदिती आढाव ,शैलैश जाधव व सतिश केदारी यांच्या उपस्थितीत राजमाता अकॅडमीच्या प्रा. अलका बेलोटे
(बोरुडे )ॲक्टिव्ह सोशल ग्रुपच्या प्रमुख कामिनी प्रकाश बाफना आयुर्वेदाचार्य डॉ. स्मिता बिपिन बोरा ,उद्योजिका व माजी सरपंच वर्षा फक्कड काळे यांना सन्मानचिन्ह व शाल देवून सन्मानित करण्यात आले .


सन्मानित करण्यात आलेल्या
राजमाता ॲकॅडमीच्या प्रा .अलका नारायण बेलोटे ( बोरुडे) या संजिवनी प्रतिष्ठानच्या अध्यापक महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर येथेही कार्यरत आहेत. डॉ . स्मिता बिपिन बोरा या आयुर्वेदाचार्य असून आयुर्वेदाच्या माध्यमातून विविध रुग्णसेवा देत असतात त्याचबरोबर त्यांचे आयुर्वेदा संदर्भात युट्युब चॅनल असून याद्वारेही मार्गदर्शन करत असतात. ॲक्टिव्ह सोशल ग्रुपच्या माध्यमातून कामिनी प्रकाश बाफना यांनी शिरूर शहरात महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात रक्तदान शिबिर त्याचबरोबर समाजातील वंचित व गरजू घटकांना विविध स्वरूपाच्या मद
ती देण्यासंदर्भात , वृक्ष संवर्धन याबाबत पुढाकार घेत असतात .तर्डोबावाडीच्या माजी आदर्श सरपंच व उद्योजिका वर्षा फक्कड काळे या सामाजिक ,राजकीय व व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असून दीप्ती एंटरप्राइजेस या कंपनीच्या मार्फत अनेक महिलांना त्यांनी रोजगार प्राप्त करून दिला आहे. शासनाने ही आदर्श सरपंच म्हणून सन्मानित केले आहे . तसेच स्नेहल झांबरे या यशस्वी उद्योजिका आहेत .
