Uncategorized

शिरूर नगरपरिषदेचा ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये राज्यात चौथा आणि देशात विसावा क्रमांक

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम-24)स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर नगरपरिषदेने आपली चमकदार कामगिरी साकारत, २० हजार ते ५० हजार लोकसंख्या गटात देशपातळीवर २० वा तर महाराष्ट्रात ४ था क्रमांक मिळवला आहे.

देशभरातील १५८१ शहरांमध्ये ही उल्लेखनीय कामगिरी करण्यात शिरूर नगरपरिषदेने यश मिळवले असून, यामुळे संपूर्ण शिरूर शहराचे नाव उज्वल झाले आहे. मागील वर्षी देशात २४१ वा आणि राज्यात ५१ वा क्रमांक मिळाल्यानंतर यावर्षीची ही मोठी झेप संपूर्ण शहरासाठी सन्मानास्पद आहे.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  प्रीतम पाटील यांनी सांगितले की, “ही कामगिरी केवळ नगरपरिषदेची नसून संपूर्ण शिरूरकर नागरिकांची, नगरपरिषद आजी माजी पदाधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची आहे. नागरिकांनी घेतलेली जबाबदारी, स्वच्छतेविषयी जागरूकता आणि कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक श्रम यामुळेच हे यश शक्य झाले. येणाऱ्या काळात आणखी उत्कृष्टता साधण्याचा नगरपरिषदेचा निर्धार आहे.”

या यशामध्ये प्रशासकीय अधिकारी  राहुल पिसाळ, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख . आदित्य बनकर, दत्तात्रय बर्गे, प्राची वखारे, सर्व मुकादम, तसेच सर्व सफाई कर्मचारी वर्ग यांनी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाचे योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button