Uncategorized
प्रश्नमंजुषा स्पर्धेत सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर मधील विद्यार्थिनी मानसी थोरात आणि श्रुती मोरे यांचा प्रथम क्रमांक
शिरुर दिनांक ( वार्ताहर )फार्मसी आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर मधील विद्यार्थिनी मानसी थोरात आणि श्रुती मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले त्यांना विजयी ट्रॉफी आणि रोख रक्कम प्रदानकरण्यात आली .

अहिल्यानगर येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. एन. जे. पाउलबुध्दे कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर येथे आयोजित आंतर महाविद्यालयीन फार्मसी प्रश्नमंजुषा स्पर्धेत सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. 

या स्पर्धेत कु. मानसी थोरात आणि कु. श्रुती मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले त्यांना विजयी ट्रॉफी आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आली.
तसेच कु. श्रेया भोसले आणि श्री. रितेश शिर्के यांनी द्वितीय क्रमांक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली त्यांना रोख पारितोषिक आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. 

ही स्पर्धा फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आणि कौशल्य वाढवण्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरली आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील विविध महाविद्यालयातून आलेल्या संघांनी सहभाग घेतला होता.
या विद्यार्थ्यांना प्रा. प्रियांका वांजुळ यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे, डॉ. हर्षवर्धन थिटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


