महाराष्ट्रविशेष

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त शिरुर येथे अभिवादन

मूकपदयात्रा व अभिवादन सभेचे आयोजन

  • स्वराज्य प्रतिष्ठान शिरुर यांच्या वतीने पाच कंदिल चौक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते

    शिरूर दिनांक ( वार्ताहर ) स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त शिरुर शहरात विविध संस्था संघटना यांच्या वतीने अभिवादन करण्यात
    आले .
    धर्मवीर शंभूराजे यांच्या बलिदानाचे स्मरण करून देण्यासाठी श्री.शिवप्रतिष्ठान शिरुरचा वतीने मूकपदयात्रा काढण्यात आली.
    . बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर मूकपदयात्रेस सुरुवात झाली. शहरातील पाच कंदिल चौक , राम आळी , मारुती आळी , हलवाई चौक ,सुभाष चौक , सोनार आळी , कुंभार आळी ,आडत बाजार , स्वर्गिय यशवंतराव चव्हाण चौक , पुणे नगर रस्त्या या मार्गाने ही मूक पदयात्रा गेली .
    मुकपदयात्रे बाबत माहिती देताना उमेश शेळके यांनी सांगितले की शंभुराजांची अंत्ययात्रा निघाली नाही.त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण व श्रद्धांजली वाहण्यासाठी फाल्गुन अमावास्येच्या दिवशी मूकपदयात्रा काढून प्रतिकात्मक चितेला अग्नी देण्यात येतोे.
    दरम्यान स्वराज्य रक्षक,धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान दिना निमित्त स्वराज्य रक्षक फाउंडेशनच्या वतीने पाचकंदील चौक,कापड बाजार शिरूर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते .
    छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य , पराक्रम , युध्द , राज्य कारभार , त्याग व बलिदान यांची माहिती विविध क्क्त्यांनी यावेळी दिली . अभिवादना साठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता .
    पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , स्वराज्य प्रतिष्ठानचे रवि लेंडे , शिरुर नगरपरिषद कार्यालयीन प्रमुख राहूल पिसाळ , मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद , शिरुर प्रवाशी संघाचे अनिल बांडे , जनता दलाचे नेते संजय बारवकर ,सामाजिक कार्यकर्ते बापू सानप , शाखाधिकारी घाडगे ,माजी सभापती अभिजीत आंबेकर  आखिल भारतीय मराठा महासंघाच्या शशिकला काळे , माजी नगरसेविका ॲड .माया गायकवाड , नितीन बारवकर ,माजी सरपंच प्रकाश थोरात , मनसेचे शहराध्यक्ष ॲड . आदित्य मैड , प्राचार्य समीर ओंकार , माहेश्वरी समाज शिरुरचे व्यवसायिक संदिप बिहाणी ,राहुल निकुंभ  , किरण बनकर हेमंत बोरा ,नितीन गायकवाड ,माजी सभापती जयवंत साळूंखे , सविता बोरुडे , नम्रता गवारी ,मुख्याध्यापिका स्वाती थोरात ,बाजार समितीचे माजी सचिव दिलिप मैड , भाजपाचे पांडे , शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे प्रमोद जोशी , शोभा परदेशी आदी यावेळी उपस्थित होते .
    प्रास्तविक रवि लेंडे यांनी केले तर आभार महिबूब सय्यद यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button