विशेष
बकरी धूत असताना तळ्यातील पाण्यात बूडून मृत्यु
- l

शिरूर दिनांक ( वार्ताहर )
आंधळगाव , ता . शिरुर येथील तळ्याच्या कडेला बकरी धुत असताना तळ्यातील पाण्यात बुडून साहेबराव चांगदेव पांढरे वय ३३ वर्ष रा. आंधळगाव ता. शिरुर जि. पुणे हे मरण पावले .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दादा सखाराम पांढरे वय ३३ वर्ष व्यवसाय शेती रा. आंधळगाव ता. शिरुर जि. पुणे यांनी याबाबत पोलीस ठाण्यास खबर दिली आहे.
साहेबराव चांगदेव पांढरे वय ३३ वर्ष रा. आंधळगाव ता. शिरुर जि. पुणे हे मेंढपाळ व्यवसाय करत होते व त्याना पोहता येत नव्हते .
३० एप्रिल रोजी पोलीस स्टेशनला खबर देणारे दादा पांढरे त्याच्या भाऊ आण्णा सखाराम पांढरे, चुलत भाऊ साहेबराव चांगदेव पांढरे असे आंधळगाव येथील वडाच्या तळ्यामध्ये बकरी धुण्यासाठी गेले होते .सर्व जण तळ्याच्या कडेला बकरी धुत असताना साहेबराव हे त्याची बकरी धुत असताना अचानक तळ्यामध्ये बुडाले त्याच्या शोध घेतला असता साहेबराव मिळून आला नाही. त्यानंतर दादा पांढरे यांनी सतीश आबा ठोंबरे यास फोन करून बोलावुन घेतले त्यानंतर सतिष याने तळ्यात बुडी घेवुन साहेबराव यास तळ्यातुन बाहेर काढले तेव्हा त्याची काहीएक हालचाल होत नव्हती त्यानंतर साहेबराव पांढरे यांना ग्रामीण रुग्णालय येथे घेण्यात आले . तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन उपचारापुर्वी मयत झाले असल्याचे सांगितले
याबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार खबाले तपास करत आहे .