विशेष

शिरुर नगरपरिषदेचा शिलकी अर्थसंकल्प

शहरातून जाणा-या पुणे नगर रस्त्यासाठी व घोडनदी संवर्धन उपक्रमासाठी ५ कोटी रु ची तरतूद घरपट्टी व पाणीपट्टीत कोणतीही वाढ नाही

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम )
शिरुर नगरपरिषदेने सन २०२५ -२६ आर्थिक वर्षासाठी शिलकी अर्थसंकल्प सादर केला .  यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही घरपट्टी वाढ अथवा पाणीपट्टीत वाढ करण्यात आलेली नाही .एकूण ९५ कोटी २८ लाख रु . चा अर्थसंकल्प आहे .
याबाबत मुख्याधिकारी प्रीतम पाटील व पालिकेचे लेखाधिकारी पंकज माने यांनी दिलेल्या माहितीनुसार अंदाजपत्रकात महसूली जमा ३१.४० कोटी रु. असून अंदाजित महसूली खर्च ३१.२४ कोटी रु. आहे. शहरासाठी चिंचणी धरणातून नवीन पाणीपुरवठा योजना करण्यात येत असून या वाढीव पाणीपुरवठा योजनेकरीता २३ कोटी ७६ लाख रु. निधीची तरतूद करण्यात आली आहे .आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरीता पंतप्रधान आवास योजनेसाठी ३ कोटी ७५ लाख रु.निधीची तरतूद करण्यात आली आहे . शहरवासियांच्या दृष्टीने महत्वाची असणारी घोडनदी नदी संवर्धन उपक्रमासाठी शासनाच्या महत्वाकांक्षी असणा-या नमामि चंद्रभागा योजनेअंतर्गत ५ कोटी रु . ची तरतूद करण्यात आली आहे .
शिरुर नगरपरिषदेच्या कर वसुली करीता १००% वसुलीचे उद्दीष्ट आहे .
शिरुर शहरातून जात असणा-या पुणे अहिल्यानगर रस्त्या करीता ५ कोटी रु. ची तरतूद करण्यात आली आहे . त्याखेरीज रस्ते,बांधकाम ,
नगरपरिषद शाळांसाठी विशेष खर्चाची तरतूद करण्यात आली आहे . वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत लाटेआळी येथील शिरुर नगरपरिषद शाळा क्र . १ चा बांधकामाकरिता ३ कोटी २५ लाख रु.ची तरतूद करण्यात आली आहे. नगर पालिका हद्दीतील १३८ दिव्यांगासाठी ९ लाख ७७ हजार रु. तरतूद करण्याबरोबरच महिलांसाठी ही ९ लाख ७७ हजार रु.ची व दुर्बल घटकांसाठी १ कोटी ४५ लाख रु .ची तरतूद करण्यात आली आहे .
नगरपालिका मालकीचा मालमत्तेतून व इतर स्थिर मत्ता याकडून भाड्याचा स्वरुपात १ कोटी ५६ लाख रु . उत्प्नन येणे अपेक्षित आहे . मागील वर्षी चे हे उद्दीष्ट १ कोटी ७ लाखाचे होते . प्लॅस्टिक बंदी दंड व अन्य दंडातून ३ लाख रु. दंड अपेक्षित आहे . मालमत्ता हस्तांतरण शुल्क १२ लाख रु अपेक्षित आहे .
बांधकाम विकास शुल्का पोटी १ कोटी रु . उत्प्नन अपेक्षित आहे .
सौर उर्जा वीजचे युनिट असल्यास व वॉटर हार्वेस्टिक ची व्यवस्था केलेली असल्यास एकूण घरपट्टीत ४ % सवलत देण्यात येते . त्याच बरोबर आर्थिक वर्ष सुरु झाल्यावर नगरपालिका घरपट्टी व पाणीपट्टीची देयके मालमत्ता धारकास प्राप्त झाल्याच्या दिनांकाच्या १५ दिवसाचा आत सदर घरपट्टी व पाणीपट्टीचा भरणा केल्यास त्यात १ % सवलत मिळणार असल्याचे ही पालिकेचा वतीने सांगण्यात आले .
अर्थसंकल्पानुसार रुपया असा येणार
कर महसुल ०.३८
अभिहस्तांकित महसुल आणि भरपाई ०.००१
महसुली अनुदाने, अंशदाने आणि अर्थसहाय्य ०.२९
नगरपरिषद मालमत्ता पासुन भाडयाचे उत्पन्न ०.०५
फी वापरकर्ता आकार आणि द्रव्यदंड ०.०१
विक्री आणि भाडे आकार – ० .०१ ,व्याजापासुन उत्पन्न ०.०१
इतर उत्पन्न ० . १५
रुपया असा जाणार
आस्थापणा खर्च ०.३५
प्रशासकिय खर्च ०.११
मत्तांची दुरुस्ती व परिक्षण ०.०१
व्यवहाराकरिता आणि कार्यक्रम अमंलबजावनी करिता खरेदी ०.३२
दिलेली महसुली अनुदाने, अंशदाने आणि अर्थसहाय्य ०.०६
तरतुदी आणि निर्लेखीत करणे ०.०९
राखीव निधी संकिर्ण खर्च ०.०६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button