अपघात

दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार

शिरूर दिनांक (वार्ताहर) शिरूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले . ठार झालेल्या मध्ये संतोष सुखदेव लोखंडे वय -४४ रा . उरळगाव , ता . शिरुर जि . पुणे व सोपान किसन मुटके वय -६५ रा . वडगाव कांदळी , ता जुन्नर जि पुणे यांचा समावेश आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव शिक्रापूर रस्त्यांवरील शिक्षक भवन जवळील दुकानासमोर भरधाव वेगातील स्कॅर्पिओ गाडीने दुचाकीस जोरदार धडक दिली . धडकेत दुचाकीवरील संतोष सुखदेव लोखंडे वय -४४ हे मरण पावले .
दुसरा अपघात बेल्हे जेजूरी महामार्गावर पाबळ नजीक झाला .या अपघातात बोलोरो गाडी उलटून एक जण मरण पावले तर तीन जण जखमी झाले .
सोपान किसन मुटके वय -६५ रा . वडगाव कांदळी , ता जुन्नर जि पुणे हे आपल्या कुटुंबियांसह बोलेरो जीप क्रमांक – एम. एच .१४ डी . एन .७३७ या वाहनातून बेल्हे जेजूरी महामार्गाने जात असताना पाबळ जवळ रस्त्याच्या कडेला वाहन उलटले व वीजेच्या खांबावर आदळले यात सोपान किसन मुटके वय -६५ हे मरण पावले . तर भोलानाथ सोपान मुटके , ऐश्वर्या भोलानाथ मुटके व रुद्र भोलानाथ मुटके सर्व रा . वडगाव कांदळी , ता जून्नर , जि पुणे हे जखमी झाले .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button