शिरुर येथे स्वामी समर्थ प्रगट दिन उत्सहात साजरा
दर्शनासाठी व महाप्रसादासाठी भाविकांची मोठी उपस्थिती

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24 )
‘जय जय स्वामी समर्थ ‘ च्या जयघोषात श्री .स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूरच्या प्रीतमप्रकाशनगर येथील श्री .स्वामी समर्थ मंदिरात श्री.स्वामी महाराजाच्या प्रगटदिन उत्सहात साजरा करण्यात आला .
श्री.स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती .पहाटे पासून भविकांनी दर्शनासाठी गर्दी केली ती रात्री उशिरा पर्यत कायम होती . प्रगट दिन सोहळ्यानिमित्त पहाटे मंदिरात पूजा विधी, काकड आरती झाली . त्यानंतर दर्शनसाठी भाविकांना मंदिर खुले झाले . सायंकाळी चारच्या सुमारास वाद्यवृदांच्या साथीत व स्वामी भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत श्री . स्वामी समर्थ महाराज यांचा पालखी सोहळा निघाला .
ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली . ‘ स्वामी समर्थ महाराज कि जय ‘ च्या जयघोष करण्यात आला . पालखी सोहळा मंदिरात आल्यावरती महाआरती व प्रकटदिन सोहळ्या निमित्त पाळणा कार्यक्रम होवून जन्मदिन सोहळा झाला. यावेळी भजनी मंडळाने भजन सेवा सादर केली . त्यानंतर महाप्रसादास सुरुवात झाली . हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मंदिरात अखंड श्री स्वामी समर्थ जप सुरु होता . संपूर्ण मंदिर परिसरावर रोषणाई करण्यात आली होती .
मंदिर परिसरात भाविकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे . मंदिर परिसरात ब्लॉक टाकण्यात आले असून भव्य अशी स्वागत कमान ही उभारण्यात आली आहे . मंदिर परिसरात भाविकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मानस असून यासाठी भाविकांनी आर्थिक योगदान द्यावे असे आवाहन श्री .स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूरच्या वतीने करण्यात आले आहे .
सेवा संस्थेचे अध्यक्ष योगेश प्रकाश वाळकीकर , उपाध्यक्ष ॲड . नारायण सिताराम पवार ,सचिव दिपक रामचंद्र वर्मा , खजिनदार गणेश पोपटराव घाटगे , कार्यकारी सदस्य संपत बाळकृष्ण लोखंडे , सचिन रामदास गुंजाळ , चंद्रकांत भिमाजी निघोजकर , विष्णु नारायण वेताळ,, प्रभावती प्रमोद पवार , भूषण विजय कडेकर , मंगलाताई नविनचंद्र बागमार आहेत .
स्वामी समर्थ प्रगटदिनानिमित्त पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता असे श्यामसुंदर चिखलीकर व गणेश घाटगे यांनी सांगितले .
गुनाट येथील झिंटे मळा येथील दत्त मंदिराचे महाराज यांनी प्रकट दिनाच्या दिवशी श्री. स्वामी समर्थ मंदिर सेवा संस्था शिरूर येथे येऊन मंदिरास भेट दिली .त्यावेळी त्यांचा सत्कार अध्यक्ष योगेश वाळकीकर ,दिलीप ठुबे, बोरसे मामा, गुंडाळ साहेब बंगाळे मामा आणि दिनेश वाळकीकर या सर्वांनी श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला तसेच
रामलिंग पंचक्रोशी प्रसादिक भजनी मंडळ शिरूर यांनी भजनसेवा सादर केली .
