शैक्षणिक

‘विद्याधाम प्रशाला शिरुर ‘ च्या विद्यार्थ्यांचे राज्यपातळीवर यश

वेदांत उदमले - नवोदय निवड, अभिरुप शिष्यवृत्ती व लक्ष्यवेध प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात प्रथम

विद्याधाम प्रशाला शिरुरचे  यश मिळविलेले विद्यार्थी

शिरूर (डेली न्यूज पोस्ट -24 टीम ) शासनमान्य विविध स्पर्धा परीक्षांत येथील विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवर घवघवीत यश संपादन केले आहे.
प्रशालेतील वेदांत उदमले या विद्यार्थ्याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली असून या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षा तसेच ‘लक्ष्यवेध’ प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यपातळीवर ‘प्रथम क्रमांक’ प्राप्त केलेला आहे.
अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत (IAS) प्रशालेतील ९ विद्यार्थी राज्यगुणवत्ता यादीत तर ४ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत. तसेच लक्ष्यवेध प्रज्ञाशोध परीक्षेत प्रशालेचे ६ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आलेले आहेत. परीक्षातील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षा(IAS) इयत्ता पाचवी :
वेदांत उदमले (राज्यात प्रथम), हर्षवर्धन बरडे (राज्यात ८ वा ) गोरेश दांडेकर ( (राज्यात १० वा) राजवर्धन काकडे (राज्यात १५ वा) शरण्या जगदाळे (राज्यात १७ वी )
इयत्ता सहावी : विराज शेळके (राज्यात ७ वा), अस्मित गावडे (राज्यात १९ वा), शिव पाचर्णे (राज्यात २१ वा), श्रेया गाडेकर (राज्यात २२ वी)
जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
मनस्वी जगदाळे ( जिल्हयात प्रथम), आर्या नलगे (जिल्हयात प्रथम) शर्वरी औदूतवर, अरविंद जायभाये (जिल्हयात प्रथम), क्षितीज सरोदे, शुभेच्छा गायकवाड (केंद्रात प्रथम)
लक्ष्यवेध प्रज्ञाशोध परीक्षा-
वेदांत उद्‌मले (राज्यात प्रथम) ऋग्वेद सरोदे (राज्यात ३ रा) अमित कारखीले (राज्यात ४ था) गौरेश दांडेकर व अरविंद जायभाये ( राज्यात पाचवा )
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक अध्यापकांचे शिरुर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, शाळा समितीचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुदत्त पाचर्णे, पर्यवेक्षक चंद्रकांत देवीकर,मच्छिंद्र बनकर, दिगंबर नाईक तसेच पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संभाजी दरोडे व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे .è

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button